अहिल्यानगरात अवैद्य गुटखा,मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Cityline Media
0
अहिल्यानगर दिपक कदम अहिल्यानगर मध्ये अवैध गुटखा- मावा माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई केली असून ४१ गुन्हयांमध्ये तब्बल ९४ लाख ६८ हजारांचा  मुद्देमाल जप्त केल्याने गुटखा माफियांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.
घडलेल्या घटनेबाबत समजलेले वृत्त असे की जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा, पानमसाला,गुटखा, सुगंधित तंबाखु विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरीता विशेष मोहिम राबवून कारवाईचे आदेश दिले आहेत.

या आदेशाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेळोवेळी पथके नेमुन विशेषत: अहिल्यानगर जिल्हयातील अवैध मावा,पानमसाला, गुटखा, सुगंधीत तंबाखु विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत अहिल्यानगर जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकुन कारवाई केली. 

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध गुटखा, मावा,सुगंधीत पानमसाला यावर कारवाई केली त्यात
गुटखा/मावा ४१ केसेस ५८ अटक आरोपी आहेत स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडून यापुढे देखील सातत्याने अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस ठाणे हद्दीत अवैध मावा,गुटखा विक्री करणाऱ्यां विरूध्द कारवाई आयोजीत करण्यात येणार आहेत.जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!