संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील हिवरगाव पावसा फाटा स्थित मुळगंगा रिहॅबिलिटेशन सेंटरचे संचालक,प्रसिद्ध अक्युपंक्चरिस्ट कैलास रहाणे प्रज्ञा राहणे यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (एजीएमए)च्या वतीने ‘महा अक्युपंक्चर रत्न पुरस्कार-२०२६ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुळगंगा रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये रुग्णांवर विना इंजेक्शन,विना दुष्परिणाम शिवाय नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात.
पॅरालिसीस, सांधेदुखी गुडघे कंबर दुखी.
सायटिका, मनक्याचे आजार हातापायांना मुंग्या येणे या आजारांवर उपचार केले जातात.मुळगंगा रिहॅबिलि टेशन सेंटर मध्ये ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, मेरिडियन मसाज, कपिंग थेरपी,मोक्षा थेरपी,शॉक थेरपी आणि कांस्य थाळी याद्वारे उपचार केले जातात.
मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करतात.अशा प्रकारे अक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दिलेल्या प्रभावी आरोग्य सेवा तसेच रुग्णसेवेत केलेल्या कार्याची दखल घेत ॲक्युपंचर तज्ञ.कैलास रहाणे व ॲक्युपंचर तज्ञ प्रज्ञा रहाणे यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने अक्युपंक्चरिस्ट, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते डॉ. सुयोग गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी,ॲड. दत्तात्रय जाधव आणि ॲड. नागेश सोनुने उपस्थित होते.
यावेळी आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कराळे,व उपाध्यक्ष डॉ. नितीन राजे पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवडकर,प्रशांत सावंत, सौ.चव्हाण,डॉ. राजेंद्र गोऱ्हे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲक्युपंचर तज्ञ.कैलास रहाणे व ॲक्युपंचर तज्ञ प्रज्ञा राहणे या दांपत्यास मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक संस्था, सहकारी डॉक्टर,मित्र परिवार तसेच चंदनापुरी ,हिरवगाव पावसा,झोळे या गावातील ग्रामस्थांकडून आणि रुग्णांकडून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
