लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील लोणी येथील रयत शिक्षण संस्थेचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयात 'गुरुपौर्णिमा' निमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण, वृक्षदिंडी व शाखा पुस्तिका प्रकाशन हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.व्यवस्थापकीय सल्लागार विश्वस्त संदीप वर्पे होते.प्रमुख उपस्थितीमध्ये जनरल विश्वस्त सदस्य किरण कडू,लायन्स क्लब शिर्डीचे अध्यक्ष विजय थोरात अध्यक्ष,बाळासाहेब केरुनाथ विखे (सदस्य,स्थानिक स्कूल कमिटी जनार्दन घोगरे सरपंच,लोणी खुर्द तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. डहाळे उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी २५,००० रुपये इतका निधी स्वखुशीने जमा केला.या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत विद्यालयाच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे अभिनंदन केले.
वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अमोल कडू,जे.के. सिनारे आर.सी पवार के.आर. ,श्री लव्हारकर व श्री शेख यांनी विशेष सहकार्य केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या नियोजनात श्रीमती एम.बी.मडके श्रीमती एस.डी दाभाडे एन.के पोकळे श्री यु.आर.गोंदके वर्पे ,श्री शेख, श्रीमती खैरे ,श्रीम पोखरकर,श्रीम शेटे व श्रीमती गोंदके यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.
विद्यालयाच्या शाखा पुस्तिकेच्या निर्मितीत पी.बी.कुलथे.एस.एस किरवे श्री.लोखंडे व श्री निर्मळ यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस किरवे यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक जे.के सिनारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पर्यावरण संवर्धन,सामाजिक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक उपक्रमांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.
