ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात वारकऱ्यांच्या दिंडीस प्रारंभ

Cityline Media
0
आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानापासून दिंडीला प्रारंभ

संगमनेर प्रतिनिधी श्रीक्षेत्र बाळेश्वर दिंडी संचलित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या पंढरपूरहून वीणापरतीच्या ‘(पळशी सोड)’ कार्यक्रमानिमित्त संगमनेर मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानापासून शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा जयघोष करत  टाळ-मृदंगाचा गजर, अभंग-गजर आणि विठ्ठल नामस्मरण करत वारकरी दिंडीत सहभागी झाले.
आमदार अमोल खताळ यांच्या निवास स्थानापासून निघालेली ही दिंडी साई श्रद्धा चौक नाशिक रोड,गणेशनगर मार्गे मातोश्री लॉन्स येथे पोहोचली.मार्गावरही नागरिकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले.मातोश्री लॉन्स येथे दिंडीचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.यानंतर श्रीक्षेत्र बाळेश्वर पायी दिंडीचे प्रमुख विश्वनाथ महाराज नवले यांचे हरिकीर्तन झाले.आपल्या कीर्तनातून त्यांनी संतपरंपरा,वारकरी संप्रदाय,नामस्मरण आणि भक्तीचा संदेश उपस्थित वारकऱ्यांना दिला. 

या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व वारकऱ्यांचा अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ,पिताश्री धोंडीबा खताळ,बंधू राहुल खताळ,पत्नी नीलम खताळ तसेच भावजय सुवर्णा खताळ व शितल खताळ यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र बाळेश्वर पायी दिंडी पालखीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!