राहाता प्रतिनिधी तालुक्यातील धनगरवाडी येथे सदगुरु महंत गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.प्रवरा चाळीसक्रोशीसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित राहिल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली.
प्रसंगी युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतःरस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. वाहनांची कोंडी हटवत त्यांनी नागरिकांना आणि भाविकांना वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला.
