लोणी रुपाली भालेराव भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या राखी पौर्णिमेचा सण नुकताच सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राहता तालुक्यातील लोणी येथील बाजारपेठेत आकर्षक राख्यांची दुकाने सजली असून, खरेदीची लगबग सुरू झाली आहे. राख्यांसोबतच भेटवस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत.रंगीबेरंगी, रेशमी धाग्याच्या, मौत्यांच्या, स्टोनवर्क केलेल्या राख्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या पसंतीनुसार राख्यांचे प्रकार बाजारात आले आहेत. यामध्ये कार्टून, देवांच्या प्रतिमा, विविध रंगांचे खडे आणि मोत्यांच्या राख्यांचा समावेश आहे.
यावर्षीच्या बाजारपेठेत पारंपरिक राख्यांसोबतच आधुनिक डिझाइनच्या राख्यांना मोठी मागणी आहे. काही राख्यांमध्ये लाईट्स आणि संगीताचा वापरही करण्यात आला आहे. यामुळे लहान मुले या राख्यांकडे आकर्षित होत आहे.
राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे दुकानांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक लोक कुटुंबासह राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात येत आहे.
राख्यांसोबतच भेटवस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.भाऊ-बहिणीला भेट देण्यासाठी चॉकलेट, मिठाई, कपडे, घड्याळे, आणि इतर भेटवस्तू खरेदी केल्या जात आहे बाजारपेठेत असलेली गर्दी पाहून विक्रेतेही आनंदित आहेत.
यंदाच्या वर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी पोलीस व्यवस्थाही करण्यात आलेले आहे राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
विविध रंगांच्या राख्या आणि भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.हा उत्साह सणाच्या दिवशी आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.राखी पौर्णिमा हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण आहे. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाला दीर्घायुरोग आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते.
भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिला सर्व संकटांपासून वाचवण्याचे वचन देतो येथे विविध प्रकारचे सामान उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळते.
हा सण भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे आणि तो आनंदात साजरा करण्यासाठी लोणीकर सज्ज आहेत.
