संगमनेरच्या क्रिडा विकासाला चालना;तीन कोटींच्या निधीतून ‌ विविध विकास कामांना गती

Cityline Media
0


-क्रीडा समितीची २०१२ नंतर प्रथमच बैठक 
-नगर परिषदेला एक कोटी रुपये वर्ग करण्याच्या क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना

संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. सन २०१२ नंतर क्रीडा समितीची एकही बैठक झाली नसल्याचे बैठकीत समोर आले.ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रीडाक्षमता असतानाही आवश्यक सुविधा, मैदाने आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.तीन कोटी रुपयांच्या निधी पैकी एक कोटी  नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा आमदार अमोल खताळ यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहावर क्रीडा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीस मुख्याधिकारी दयानंद गोरे  निवासी नायब तहसीलदार  सुभाष कदम तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे  सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय टेकाळे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांच्यासह क्रीडाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, तालुक्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सन २०२१ मध्ये तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्ताव सादर केल्यानंतर निधी मंजूर होण्यासाठी काही कालावधी लागतो.

महायुती सरकारच्या माध्यमातून हा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीच्या कामात कोणत्याही प्रकारचे राजकारण केले नाही. तालुक्यातील खेळाडू आणि तरुणांच्या हिताला प्राधान्य दिले जाणार आहे.

तीन कोटी रुपयांच्या निधीपैकी एक कोटी रुपये नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या निधीतून  नगर परिषदेतर्गत बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीचे काम तसेच बॅडमिंटन हॉल दुरुस्ती साठी हा निधी वापरण्यात येणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले

शासनाच्या सन २०१६ च्या अध्यादेशानुसार क्रीडा संकुलाची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्याबाबतही क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी काही पदांवर कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास तसेच क्रीडा समितीमध्ये काही आमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यास क्रीडा समितीचे अध्यक्ष या नात्याने मंजुरी देण्यात आली आहे.ग्रामीण भागातील खेळांडुना सरावासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विस्तृत आणि अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी किमान पाच ते दहा एकर जागेचा शोध घेण्याच्या सूचना महसूल विभागाच्या  अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जागा निश्चित झाल्यानंतर आधुनिक सुविधांनीयुक्त क्रीडा संकुल उभारण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र, त्यांना योग्य प्रशिक्षण, मैदाने आणि आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या गुणवत्तेला योग्य वाव मिळत नाही. नव्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.


संगमनेरला लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार  

आगामी काळात संगमनेर शहरात सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय ठेवून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे संगमनेरला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळेल. तसेच स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
अमोल खताळ आमदार संगमनेर विधानसभा
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!