नाशिक दिनकर गायकवाड शहरात आरोग्यसंपदा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप सेंटर येथे नुकतेच ‘हृदय:सत्य आणि मिथ्या’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.होते व्याख्यानाचे प्रमुख वक्ते इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल शेवाळे (एमडी मेडिसिन,डीएम कार्डिओलॉजी, एफएससीएआय – यूएसए) होते.
डॉ.शेवाळे यांनी सांगितले की,मधुमेह असलेल्या प्रौढांना हृदयविकार होण्याची शक्यता सामान्य व्यक्तींपेक्षा २ ते ४ पटींनी जास्त असते. भारतात सुमारे ७.३% प्रौढांना मधुमेह आहे.हृदयविकाराचे प्रमुख जोखीम घटक म्हणून उच्च रक्तदाब (८६%),
तंबाखू व धूम्रपान (७६%), अनियंत्रित मधुमेह (७०%) आणि ट्रान्स फॅट्स व जंक फूड (६२%) यांचा उल्लेख त्यांनी केला.त्यांनी आहारा बाबतच्या गैरसमजुती दूर करताना सांगितले की, फक्त तेलकट अन्नच नव्हे तर जास्त मीठ आणि साखरही धोकादायक आहे.
