गोविंदा पथकाच्या इच्छेखातर आमदार खताळांनी फोडली दहीहंडी

Cityline Media
0
पुण्याच्या महिलांना दहीहंडी सलामी देण्याचा पहिला मान

अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच आठ थराचा मनोरा लावण्याचा विक्रम 

संगमनेर प्रतिनिधी आतापर्यंत विविध गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली आहे असे अनेकदा पाहायला मिळाले आहे मात्र,संगमनेरला यावर्षी आमदार खताळ युवा मंचच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाने एक अनोखा आदर्श निर्माण केला.आमदार अमोल खताळ पाटील युवा मंचच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाची सलामी देण्याचा पहिला मान पुणे कसबा येथील जुनी जोगेश्वरी रणरागिणी महिला गोविंदा पथकाच्या  महिलांना देण्यात आला. महिलांच्या सन्मानाला प्राधान्य देत घेण्यात आलेल्या या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत केले. तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच आठ घराचा मनोरा लावण्याचा विक्रम संगमनेरात आमदार खताळ युवा मंचच्या वतीने करण्यात आला.संगमनेर बसस्थानक परिसरात गोकुळाष्टमीचे औचित्य साधून आमदार अमोल खताळ पाटील युवा मंच यांच्यावतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या उत्सवासाठी पुणे, ठाणे तसेच जुन्नर तालुक्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती.

पुणे कसबा येथील जुनी जोगेश्वरी महिला रणरागिणी गोविंदा पथक यांनी सर्वप्रथम चार थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडीला सलामी दिली. त्यानंतर ठाणे येथील जय हनुमान गोविंदा पथकाने एक दोन तीन नव्हे तब्बल आठ थरांचा मनोरा उभारून  उपस्थितांची मने जिंकली.

शेवटी शिवशंभो गोविंदा पथक, शिवजन्मभूमी ओतूर (ता. जुन्नर) यांनी पाच थरांचा मनोरा रचत दहीहंडी उत्सवात चांगलीच रंगत आणली. आमदार अमोल खताळ पाटील युवा मंच पहिल्याच वर्षीच्या या दहीहंडीची हंडी फोडण्याचा मान महिलांना देण्याचा आयोजकांचा मानस होता.

मात्र, पहिलीच दहीहंडी असल्यामुळे उपस्थित सहभागी सर्व गोविंदा पथकांनी पहिल्या वर्षाची दहीहंडी आमदार अमोल खताळ यांनीच  फोडावी, अशी आग्रही इच्छा व्यक्त केली. 
 गोविंदा पथकांच्या भावनेचा आदर करत आमदार खताळ यांनी हे आव्हान स्वीकारले. ठाणे येथील जय हनुमान गोविंदा पथकाने उभारलेल्या तीन थरांच्या मानवी मनोऱ्यावर आमदार खताळ स्वतः चढले.

 ‘बोल बजरंगबली की जय, जय सियाराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रचंड गर्दीच्या साक्षीने आमदार खताळ यांनी मानवी मनोऱ्यावर चढून दहीहंडी फोडताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष केला. त्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी दंड थोपटात मीच एकटा तुम्हाला बास असे विरोधकांना दाखवून दिले.

ढोल-ताशांचा गजर,गोविंदा पथकांची थरारक कसरत,आणि  घोषणाबाजी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. संगमनेर शहर आणि  तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीच्या वतीने सुरू झालेला दहीहंडी उत्सव संगमनेर मध्ये निरंतर 
संगमनेरमध्ये यापूर्वी दहीहंडी उत्सवाचे आयोजन होत नव्हते. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने या उत्सवाची सुरुवात केली.यंदा महायुतीच्या वतीने दहीहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिलांना प्रथम मान देऊन दहीहंडीची सलामी देण्यात आली, ही संगमनेरसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. पुढील वर्षी आठ थरांची दहीहंडी आयोजित करण्याचा मानस आहे.
 आमदार अमोल खताळ संगमनेर

संगमनेरात परिवर्तनाचे दर्शन
पूर्वी दहीहंडी फोडण्याचा मान प्रामुख्याने पुरुषांना मिळत असे.मात्र,काळ बदलला असून महिलांनीही प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे.याच बदलाचे आणि परिवर्तनाचे दर्शन या दहीहंडी उत्सवातून घडले.महायुतीच्या वतीने आयोजित दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिलांना देण्याचा निर्णय आमदार अमोल खताळ यांनी घेतला, ही महिलांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

सौ.नीलम खताळ सामाजिक कार्यकर्त्या संगमनेर
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!