आमदार अमोल खताळ पाटील यांची प्रमुख उपस्थिती
संगमनेर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले यांनी पेमगिरीच्या शाहगडावरून हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला.या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवार , दि. १५ सप्टेंबर रोजी ३९२ वा हिंदवी स्वराज्य संकल्प दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास आमदार अमोल खताळ पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी डॉ.संदीप महिंद गुरुजी यांचे ऐतिहासिक व्याख्यान होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मारुती मंदिरापासून पालखी मिरवणुकीने होणार असून, शाहगडावर ध्वजा रोहण,प्रतिमा पूजन, राज्याभिषेक सोहळा, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . शाहगडावरील हा ऐतिहासिक सोहळा नव्या पिढीला स्वराज्याचा इतिहास, शौर्य व राष्ट्र निष्ठेची प्रेरणा देणारा ठरणार आहे तरी या कार्यक्रमासाठी शाहू -शिव-शंभूप्रेमी, इतिहासप्रेमी,विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन शाहजीराजे हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, पेमगिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
