झरेकाठी वार्ताहर संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथील दत्तू भीमा माळी(वय ७०)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
दत्तू माळी आदिवासी भिल्ल समाजाचे तडफदार कार्यकर्ते होते ते गोरगरीब मदतीला नेहमी धावून जात.तसेच जनसेवा मंडळाचे व विखे पाटील परिवाराचे खंदे समर्थक होते.अखेरपर्यंत त्यांनी विखे पाटील परिवाराचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
