कोल्हारच्या गणेश मंडळाची चोरी गेलेली महागडी केबल भंगारवाल्यास विकल्याची शक्यता!

Cityline Media
0
कोल्हार ज्ञानेश्वर साबळे गणपती उत्सवात गणेशोत्सवाचे सर्वत्र भक्तीमय वातावरण असताना राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे श्री‌.गणेश मंडळाच्या विद्युत रोषणाईसाठी जोडलेली सुमारे ७५ हजार रुपये किमतीची उच्च दर्जाची १०० फूट केबल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत विरेंद्र शामगीर गोसावी (वय २७, रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांनी लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दिलेल्या प्रथम खबरीत ‌म्हटले आहे की रात्री साडेअकराच्या सुमारास कोल्हार बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या संकुलनात ‘एकलव्य मित्र मंडळ,भगवती नगरचा राजा’ या गणेश मंडळाच्या वीज डेकोरेशनसाठी त्यांनी २४ कोअरची काळ्या रंगाची आणि सर्वोत्तम दर्जाची १०० फूट केबल जोडली होती.

सकाळी ६ वाजता विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.त्यानंतर सकाळी १० वाजता गणेश मंडळाच्या ठिकाणी विद्युत प्रवाह व साउंड सिस्टिम तपासण्यासाठी गेले असता,जोडलेली केबल जागेवर आढळून आली नाही.परिसरात शोध घेऊनही केबल मिळाली नाही.

त्यामुळे अज्ञात व्यक्तीने ती चोरली.चोरीस गेलेल्या केबलची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता  कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घडलेल्या घटनेचा पुढील तपास हे.कॉ. वाल्मिक परधी करीत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!