दशक्रिया विधी घाटाच्या वास्तुत सोलर सिस्टिम उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यातून विकसित झालेल्या शहरातील दशक्रिया विधी घाटाच्या वास्तूत  नागरीकांच्या सोयीसाठी सोलर व्यवस्था बसवून देण्याची ग्वाही पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
गंगामाई घाटावर संघाचे जेष्ठ स्वयंसेवक दिवंगत पाठक बंधू यांच्या धर्मशाळेच्या जागेवर संघचालक अशोक सराफ आणि पुरोहीत संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांच्या पुढाकाराने नागरीकांच्या सुविधेसाठी दशक्रीया विधी घाटाची वास्तू विकसित करण्यात आली आहे.या वास्तूसाठी पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने सुमारे चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला.आमदार अमोल खताळ यांचा यासाठी पाठपुरावा होता.वास्तू उभारणीसाठी संगमनेर नगरपालिकेचे सहकार्य मिळाले.

वास्तूच्या कोनशिलेचे औपचारीक लोकार्पण संघचालक अशोक सराफ आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.संघाचे सुभाष कोथमिरे आमदार अमोल खताळ पुरोहीत संघाचे भाऊ जाखडी भाजपाच्या शहर अध्यक्षा सौ.पायल ताजणे राष्ट्रवादी कपिल पवार काँग्रेसचे आबासाहेब थोरात शिवसेनेच्या नगरसेविका सौ.साक्षी सूर्यवंशी यांच्यासह स्थानिक नागरीक कार्यकर्ते उपस्थित होते.

दशक्रीया विधी घाटाच्या इमारतीची पाहाणी करून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या सुविधेसाठी वास्तू चांगल्या पध्दतीने निर्माण झाल्याचे समाधान व्यक्त केले.मात्र थंडीच्या कालावधीत नागरीकांना गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून  सोलर व्यवस्था बसवावी,याचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याची सूचना त्यांनी पालिकेचे मुख्याधिकार्यांनी गोरे यांना दिली.घाटाच्या सुरक्षेसाठी सीसी टिव्ही आवश्यक असून याचाही गांभीर्याने विचार करण्याचे त्यांनी सूचित केले.

संघचालक अशोक सराफ यांनी दिवंगत.पाठक बंधूनी या जागेचा विनियोग सामाजिक हितासाठी व्हावा आशी इच्छा व्यक्त केली होती.त्यानूसार पुरोहीत संघाच्या पाठपुराव्यातून विकसित झालेल्या वास्तूसाठी मंत्री विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाळुंगी नदीवर असलेल्या पुलाला लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील साईसेतू असे नाव देण्यात आले.नामफलकाचे अनावरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या पुलास बाळासाहेब विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला होता.मात्र मोठ्या स्वरूपात आलेल्या पुरामुळे पूल खचला होता.आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

शहराचे आराध्य दैवत असलेल्या मोठे मारुती मंदीराच्या सभामंडपाचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले या सभागृहाच्या कामास मंत्री विखे पाटील यांनी तीस लाखांचा निधी मंजूर करून दिला होता.या समारंभास आमदार अमोल खताळ मंदिर विश्वस्त समितीचे विनय गुणे कमलाकर भालेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!