नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि परिसरातील शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या तीन-चार महिन्यांपासून पावसाचे पाणी साचत आहे. निचऱ्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. महिला,ज्येष्ठ नागरिकांना विशेष अडचण येत असून संसर्ग आणि घसरण्याचा धोका आहे.
याबाबत रविराज सोनवणे आणि गोपाल जाधव यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी चर्चा केली. “अधिकारी या रस्त्याने नियमित ये-जा करत असतील तर समस्या लक्षात का आली नाही?” असा सवाल उपस्थित केला.
स्टॅम्प व्हेंडरच्या जुन्या इमारतीतही पाणी गळती होत आहे.एक वर्षापूर्वी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे निंबाच्या झाडाच्या वाळवीच्या समस्येची तक्रार केली होती,पण देखभाल अद्याप झाली नाही.
