संगमनेर ते कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग औद्योगिक दृष्टीने महत्वपूर्ण-मंत्री विखे पाटील

Cityline Media
0
महायुती सरकारकडून ९७ कोटींचा निधी उपलब्ध

संगमनेर प्रतिनिधी नाशिक,त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर संगमनेर - वडगाव - निळवंडे - कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग १६० ड जांभूळवाडी फाट्या पर्यतचा रस्ता जिल्ह्याच्या औद्योगिक आणि अध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार अमोल खताळ.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपअभियंता संजय टेकाळे यांच्यासह संगमनेर तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

संगमनेर - वडगाव - निळवंडे - कौठे कमळेश्वर राष्ट्रीय महामार्ग १६०ड (जांभूळवाडी फाटा) रस्ता कामाची लांबी एकूण २० किलोमीटर असून यासाठी ९७ कोटी २५ लक्ष रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुधारणा काम मे २०२७ अखेर पूर्ण करण्याच्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की,अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण केंद्र होत आहे.समृध्दी महामार्ग आणि शिर्डी विमानतळासाठी हा मार्ग उपयुक्त करणार आहे.शिर्डी शनिशिंगणापूर तसेच अन्य अध्यात्मिक ठिकाणांना जोडणारा मार्ग येणाऱ्या भाविकांसाठी  फायद्याचा ठरणार आहे.कुंभमेळ्याच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांची संख्या पाहाता  रस्त्याची सुविधा दर्जेदार उपलब्ध व्हावी, तसेच वेळेत काम पूर्ण करण्याचेही त्यांनी सुचित केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!