संगमनेर प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी बंटी यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल नुकतेच संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत थोरात साहेब, जिल्हा काँग्रेसचे जनरल सचिव रामनाथ गायकवाड मा. जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनू गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे,ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते विनोद गायकवाड, काँग्रेसचे मा. कार्याध्यक्ष संतोष गायकवाड गणेश बलसाने, ठेकेदार उमेश गायकवाड आदी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या वतीने बंटी यादव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच संगमनेर शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग व तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
