पांडवलेणी परिसरात घोणस सापाचा सर्पमित्र ऋषिकेश कांबळे यांनी केला बचाव.

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील पांडवलेणी परिसरात घोणस जातीचा साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तर लहान बालकांत घबराट निर्माण झाली जो तो आपला बचाव करत होता मग परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा साप आल्यानंतर लोकांनी येथील सर्पमित्र ऋषिकेश कांबळे यांना याबाबत दूरध्वनी वरून माहिती देण्यात दिली.
माहिती मिळताच ऋषिकेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घोणस सापाला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षितपणे बचाव केला.यावेळी सर्पमित्र श्री.कांबळे म्हणाले की कुठल्याही सर्पाला मारू नका सर्प ओळख करून घ्या त्याची जात ओळखायला शिका आणि वेळीच सावध होऊन सर्पमित्रांशी संपर्क साधा कारण हे असे सर्प दुर्मिळ असतात सर्पला मारल्यास निसर्गाची हानी होते. सर्प जरी विषारी असले तरी त्यांचा जगण्याचा हक्क ना करू नकारु नका.त्यानंतर त्यांनी या सापाला सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात सोडून दिले.

पांडवलेणी परिसरात नागरिक व पर्यटकांची नेहमीच मोठी वर्दळ असते.त्यामुळे साप आढळल्यास त्याला मारण्याऐवजी तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!