निधी रस्ते,पाणीपुरवठ्यासह मूलभूत सुविधांसाठी वळविणार
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील भद्रकाली परिसरात कत्तलखाना आणि बीफ मार्केटच्या बांधकामासाठी प्रशासनाकडून काढण्यात आलेली सुमारे ५ कोटी रुपयांची ई-निविदा तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचे आदेश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत या आदेशामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका महापौरांनी यावेळी स्पष्ट केली.
नाशिक ही पवित्र कुंभभूमी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. शहराची धार्मिक परंपरा आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेता,त्यांना धक्का पोहोचविणारा कोणताही प्रशासकीय निर्णय स्वीकारला जाणार नाही,असे महापौरांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.विशेषतः 'सकल -हिंदू नाशिकच्या पावित्र्याशी आणि नागरिकांच्या भावनांशी कोणतीही तडजोड नाही.
आपले नाशिक ही पवित्र कुंभभूमी आणि दक्षिण काशी आहे.येथील सांस्कृतिक परंपरेला आणि सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवणारा कोणताही प्रशासकीय निर्णय खपवून घेणार नाही. कत्तलखान्यासाठी प्रस्तावित निधी शहरातील प्रलंबित रस्ते,पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी वर्ग करण्यात येईल. नाशिकचा विकास आणि पावित्र्य जपणे, हेच आमचे प्रथम कर्तव्य असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
- हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक महापालिका
समाजाच्या' धार्मिक भावनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कत्तलखान्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी आता शहरातील प्रलंबित रस्ते,पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी वर्ग
करण्यात येणार आहे. त्यामुळे रखडलेल्या नागरी कामांना या निधीतून चालना देण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे. महापौरांच्या आदेशामुळे भद्रकाली परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाला तूर्तास ब्रेक लागला असून,पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे लागले आहे. नागरिकांचे लक्ष लागले आहे.
