ठक्कर बाजार बस स्थानकात १७ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील ठक्कर बाजार बस स्थानक परिसरातून त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा  बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घडलेल्या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक मधील अत्यंत गजबजलेल्या ठक्कर बाजार बसस्थानकात हि काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय रविवारी रात्री सुमारे नऊ वाजताच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ती युवती ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती.रात्रीच्या वेळी बसस्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.बस पकडण्यासाठी चाललेल्या धडपडीत आकांक्षाला जोरात धक्का लागला आणि ती अचानक खाली कोसळली.याच वेळी स्थानकातून पुढे जाणाऱ्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

अपघातानंतर आकांक्षाच्या चुलत भावाने अत्यंत तत्परता दाखवत तिला तातडीने रिक्षामधून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. स्वतःच्या डोळ्यांसमोर लेकीचा असा भीषण अपघात आणि मृत्यू पाहिल्याने तिच्या आईला मोठा धक्का बसून त्या जागीच भोवळ येऊन पडल्या.

दरम्यान,या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवणाऱ्या एसटी बसचालक विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे, प्रवाशांच्या अतिगर्दीमुळे आणि लोटालोटीमुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्टीकरण परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहे.या घटनेमुळे नाशिककरांमधून आणि प्रवाशांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!