हनुमंतगावात साडेतीन वर्षाचा बालक बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावला

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहाता तालुक्यातील हणमंतगाव येथे भरदुपारी बिबट्याने साडेतीन वर्षांच्या अद्विक अजिंक्य घोलप याच्यावर लक्ष केंद्रित केले.मानवी वस्तीवर आलेल्या बिबट्याने प्रथम कोंबडीवर हल्ला केला मात्र कोंबडीची शिकार निसटल्याने आक्रमक होऊन येथील एका साडेतीन वर्षाच्या बालकावर झडप घेतली.मात्र प्रसंगावधान राखल्याने तो बालक बालंबाल बचावला.
सविस्तर वृत्त असे की येथे जवळपास १५ ते २० फूट अंतरावर खेळत असलेल्या अद्विककडे बिबट्याची नजर गेली.याचवेळी शेजारील वस्तीवरील साक्षी सुनिल घोलप हिचे बिबट्याकडे लक्ष गेले. तिने क्षणाचाही विलंब न करता धावत जाऊन अद्विकला उचलले आणि गोठ्यात नेले.साक्षीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक विकास म्हस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने परिसरात तीन पिंजरे लावले असून थर्मल ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.मात्र,बिबट्या अजूनही पिंजऱ्यात अडकलेला नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!