संगमनेर प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,बौद्धांचा बुलंद आवाज खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी (उत्तराखंड) येथील सभा स्थळाचे काही मनुवादी समाजकंटकांनी गंगाजलाने शुद्धीकरण केल्याच्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ नुकताच संगमनेर येथे काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी,अनुसूचित जाती विभागाच्या वतीने.प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, संगमनेर भाग आणि डॉ.कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर भाग यांना जाहीर निषेधाचे नुकतेच निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "खर्गे हे देशातील आंबेडकरी समाजाचे जेष्ठ नेते आहेत.केवळ ते दलित समाजातून येतात म्हणून त्यांच्या सभास्थळाचे शुद्धीकरण करणे हा केवळ खर्गेचा नाही तर भारतीय संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचाराचा आणि संपूर्ण ए.सी/एस.टी समाजाचा अपमान आहे.हा मनुवादाचा विकृत चेहरा असून आम्ही तो कदापि सहन करणार नाही."
या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आंबेडकरी,पुरोगामी जनतेत तीव्र संताप असून,संबंधित समाजकंटकांवर तात्काळ अट्रॉसिटी (अनु. जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक)ई कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी आधी पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते के.एस. नाना गायकवाड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण गावित्रे,ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते के.पी.बनसोडे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रामनाथ गायकवाड,संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनू गायकवाड, पॅन्थर विनोद गायकवाड, जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया समन्वयक उदय अभंग,महेश हांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
