भांडकुदळ पत्नीने युवकास रस्त्यात अडविले मग पतीने फावड्याने दुखापत केली.

Cityline Media
0


६ जणांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांत तक्रार दाखल

नाशिक दिनकर गायकवाड शहरातील रस्त्यात अडवून तरुणाला फावड्याच्या दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच शरयूनगरी, पांडवनगरी परिसरात घडली.या. मारहाणीत तरुणाच्या डोक्याला, कानाला आणि उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली असून, मनगटाचे फॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी दीपक शेट्टी (२७, पांडवनगरी, इंदिरानगर) यांनी इंदिरानगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
फिर्यादीनुसार,दीपक शेट्टी हे दुपारी आडीज वाजे दरम्यान शरयू नगरीकडून पांडवनगरीतील घरी जात होते.त्यावेळी कैलास शिलावट व त्यांची पत्नी सौ.ज्योती यांनी त्यांना रस्त्यात अडवून दमदाटी केली. त्यानंतर कैलास याने पाठीमागून फावड्याच्या दांड्याने मारल्याने दीपक खाली पडले.

ज्योती हिने चपलेने त्यांच्या चेहऱ्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान,कैलासचा भाऊ मांगिलाल व भुऱ्या हे तेथे आले. त्यानंतर चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी तसेच फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. तसेच कैलास याने शैला शिरसाठ व तिची मैत्रीण कल्याणी आहेर यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. या दोघींनीही शिवीगाळ करत फावड्याच्या दांड्याने मारहाण केली.या मारहाणीत दीपक यांच्या डोक्याला, कानाला, छातीला आणि उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!