कोपरगाव प्रतिनिधी शहरी भागातील आशा कर्मचारी यांनी नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिपावली साठी सानुग्रह अनुदानाची मागणी केली नाशिक महानगर पालिकेने आशा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान २२ हजार रुपये मंजुर केले आहे.
दिपावली सणासाठी हे अनुदान नाशिक महानगर पालिका आशांना देणार आहे त्याच धरतीवर कोपरगाव नगर पालिकेने आशा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन कोपरगाव तालुका आशा कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केले आहे.
नाशिक सारखे संपुर्ण महाराष्ट्रात आशा आरोग्य सेवेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहे त्यांना मानधन देखील तुटपुंजे आहे ते देखील वेळेवर होत नाही त्यामुळे दिपावलीचा सण जवळ आला आहे या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना नगर पालिकेने योग्य दिपावली भेट द्यावी अशी अहिल्यानगर आशा कर्मचारी संघटनेची मागणी आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या धरतीवर संपुर्ण महाराष्ट्रात महानगर पालिका नगर पालिका ग्रामपंचायत स्तरावर आशांना दिपावली भेट द्यावी अशी आशा कर्मचारी संघटनेची मागणी आहे या निवेदनावर .स्वाती आरणे उज्वला दुशिंग योगिता भोसले सोनाली राऊत विजया दुशिंग छाया सुपेकर सुनिता देवरे कविता हिवरडे सपना दाभाडे वैशाली वाघ यांच्या सह्या आहेत.
