सप्तशृंगी गड पायथ्याशी झालेल्या अपघातात पोलीस उपनिरिक्षक विजय गायकवाडांचा मृत्यू.

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी–अभोणा चौफुली जवळ भरधाव कारने पोलीस बंदोबस्तावरील अधिकारी-कर्मचारी आणि देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धडक दिल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली.
या भीषण अपघातात पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारा दरम्यान दुदैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना एका पोलीस अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागणे ही अत्यंत दुःखद घटना आहे.या घटनेमुळे पोलीस दलासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!