पारनेर मध्ये दिवाळी सणाला किडे,जाळी आळी असलेले धान्य वितरित;मनसेचा संताप

Cityline Media
0
प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष - तहसीलदारांसह ४ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पारनेर प्रतिनिधी तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये गोर-गरीब जनतेला दिवाळीच्या सणासुदीत किडे,आळी आणि जाळी असलेला, आरोग्यास अपायकारक आणि कुजलेला तांदूळ वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक, पारनेर व सुपा पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे

दिलेल्या तक्रारीत मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी म्हटले आहे की पारनेरच्या रेशन दुकानांवर नियंत्रण असलेल्या तहसीलदार श्रीमती गायत्री सौंदाने यांना दि. २१ व २२ ऑक्टोबर रोजी दोन वेळा लेखी तक्रार देऊनही त्यांनी कोणतीही तपासणी, जप्ती किंवा वाटपास स्थगिती दिली नाही.

शासनाने गरीब जनतेसाठी पाठवलेला अन्नधान्य साठा सुरक्षित असणे बंधनकारक असताना, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विषारी अन्न वाटणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. या संपूर्ण प्रकारास तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, अहमदनगर, अप्पर जिल्हाधिकारी,अहमदनगर, अन्न सुरक्षा अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार आहेत.

मनसेने या अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २७५, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ कलम ५९, ५१, ५४, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३, ७ आणि सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश २०१५ कलम ७(११)_ अन्वये तात्काळ फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. "

दिवाळीच्या तोंडावर गोर-गरीब पारनेरकरांच्या जीवाशी खेळ चालला आहे.तहसीलदारांना लेखी कळवूनही ते गप्प आहेत. हा सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हे सडके धान्य जप्त करून प्रयोगशाळेत पाठवावे,अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन होईल." असे मनसे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी स्पष्ट केले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!