शिर्डी प्नतिनिधी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग अहिल्यानगर व प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत नुकतेच सर्व रोग निदान शिबिर उत्साहात पार पडले.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील मित्रमंडळ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.शिबिरात ६५० रुग्णांनी विविध आजारावर तपासणी व औषध उपचार घेतले.
शिबिरासाठी प्रमुख उपस्थितीत शिर्डी नगर परिषदेचे मुख्य कार्याधिकारी शिर्डीच्या नगराध्यक्ष ,उपनगराधक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी संजय घोलप व ग्रामीण रुग्णालय राहताचे वैद्यकीय अधीक्षक गोकुळ घोगरे , लोणी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालय लोणी ,शिर्डी साईबाबा हॉस्पिटल, प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी , स्थलांतरित कामगार हस्तक्षेप गट लोणी,स्नेहज्योत प्रकल्प,यांचे सर्व समुपदेशक व प्रयोगशाळा,तंत्रज्ञ आउट रिच वर्कर,यांनी विशेष सहकार्य केले.
