आमदार हेमंत ओगले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे धाव
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) शहरातील बऱ्याच रस्त्यावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली होती मात्र विकास आणि रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहिम पालिकेच्या अतिक्रमण विभाग व पोलिस प्रशासनाने ही मोहीम संयुक्तपणे राबवली,बेलापूर रस्त्यावरील सुमारे ६० ते ६५ अतिक्रमणे मोठ्या पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली यावेळी अनेक व्यवसायिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले त्यात पुढील पंधरा दिवस हि मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिली.
ही अतिक्रमणे काढल्यानंतर एक मुद्दा निर्माण झाला की रहदारी व शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ही अतिक्रमणे हटवली जातात.गुदमरलेले रस्ते मोकळा श्वास घेतात हे खरे.मात्र दुसऱ्या बाजूला एक एक पैसा जोडून उभा केलेला व्यवसाय,संसार आपल्या देखत नेस्तनाबूत केला जात असताना उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या गरीबाची काय अवस्था होत असेल.ऐपत नसल्याने मुलाबाळांची पोटे भरण्यासाठी जागा मिळेल तेथे मोठ्या उमेदीने टाकलेले दुकान मोडून पडल्यावर त्याला काय वेदना होत असतील याचा आपण फक्त विचार करू शकतो.एकीकडे अवाढव्य संपत्ती तर दुसरीकडे कमालीचे दारिद्र्य अशा समाजात जगताना इलाज नसताना अनेकांना अतिक्रमित जागेत संसार उभारावा लागतो.यात नक्की दोष कुणाचा? हा प्रश्न व्यवस्थेचा बळी ठरलेला प्रत्येक जण आज विचारताना दिसतो.
या कारवाईनंतर निर्माण झालेले विदारक दृश्य काळजात धस्स करून जाते.आणि डोळ्यात अश्रू तरळतात.
बेलापूर रस्त्याला पश्चिम बाजुला ही मोहीम सुरू झाल्यानंतर पुर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपलीं अतिक्रमणे काढण्याची तयारी दर्शवली आणि सुरू केले.अनेकांनी आपले सामान हलविण्यासाठी पुर्ण कुटुंब रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसुन येते होते.
-आमदार हेमंत ओगले यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव-श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने शहरात सुरू केलेल्या अतिक्रमणे हटाविण्याच्या कारवाईला स्थगिती देऊन भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी आ. हेमंत ओगले यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आ.ओगले यांनी मुख्यमंत्र्यांना सात दिवसांत अतिक्रमणे काढण्याच्या नोटीसा दिल्याने व्यापारी वर्गात प्रचंड भितीचे वातावरण असल्याचे सांगितले आ.ओगले यांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून या अतिक्रमण हटावच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली.