छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, मुस्लिम आरक्षण समिती, रिपब्लिकन बहुजन सेना, रिपब्लिकन धर्मनिरपेक्ष,एम. आय. एम.या संघटनांचा समावेश
नाशिक (दिनकर गायकवाड) छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारा चित्रपट अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार दि.१६ फेब्रुवारी रोजी शालीमार नाशिक उपोषण करण्याचा इशारा येथील सामाजिक संघटनानी नाशिक शहर पोलिस आयुक्तांना लेखी निवेदननाद्वारे दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सोलापूरकर यांनी छत्रपती महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करून शिवरायांचे पराक्रम व महत्व कमी करून दाखविण्याचा प्रयत्न केला, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे महत्त्व कमी करण्यासाठी वेदांचा हवाला देऊन बाबासाहेब ब्राम्हणवादी होते असे दाखविण्याचा निच प्रयत्न या निच प्रवृत्तीकडून झाला या सर्वच त्यांच्या वक्तव्यावरुन असे निदर्शनास येते की मनुवादी पिलावळी मनुस्मृतीच्या आदेशानुसार ब्राह्मण हाच सर्वात उंच आहे.व सर्व महापुरुष ब्राह्मण संस्कृतीला मानणारे होते म्हणून ते महापुरुष झाले.असे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न राहुल सोलापूरकर या व्यक्तीने केला आहे. त्याचेवर त्वरित देशद्रोह, महापुरुषाचा अवमान व ॲट्रॉसिटीचा गुन्हा २४ तासाचे आत दाखल करावा अन्यथा खालील सह्या करणारे विविध संघटनेचे पदाधिकारी दि.१६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११ पासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब पुतळा शालीमार चौक येथे उपोषण सुरू करतील.
निवेदनावर , रिपब्लिकन पार्टी (धर्मनिरपेक्ष)चे शाम विनायक गायकवाड छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अजिज अब्बास
पठाण मुस्लिम संघर्ष आरक्षण समितीचे चांद मुश्ताक शेख तसेच एम आय एमचे शहराध्यक्ष मुखत्यार शेख यांच्या सह्या आहेत
