आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते श्रीकांतजी भालेराव यांची अमृत महोत्सवी प्रेरणादायी वाटचाल.

Cityline Media
0
हिवरगाव पावसा येथे कार्यकर्ते घडविणाऱ्या नेतृत्वाच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे दिमाखदार आयोजन.
 
   
उत्कृष्ट संघटन व संवाद कौशल्य,तडफदार भाषण शैली,सामाजिक प्रश्नांची जाण,सर्वसामान्य व्यक्तींच्या,कार्यकर्त्यांच्या सुख- दुःखात सहभागी,उत्तम 
प्रशासकीय ज्ञान,संयमी स्वभाव यामुळे चळवळीतील कार्यकर्ते,
तळागाळातील जनतेशी जोडलेली नाळ असे सुपरिचित असलेले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हयाचे संपर्क प्रमुख श्रीकांत तबाजी भालेराव होय.वयाच्या ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या या ज्येष्ठ नेतृत्वाचा काम करण्याचा उत्साह वाखण्याजोगा आणि अव्वल दर्जाचा आहे.कार्यकर्ते निर्माण करणारे नेतृत्व,झुंजार पॅंथर,तडफदार,संयमी, अभ्यासू,आंबेडकर चळवळीत
राज्यस्तरावर कार्य करणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीकांत भालेराव यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संघर्षमय जीवनप्रवास त्यांचे कार्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देणारा आहे.

श्रीकांत तथा कारभारी तबाजी भालेराव यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९५० रोजी हिवरगाव पावसा येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा हिवरगाव पावसा येथे झाले.त्यानंतर पुढील शिक्षण संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयात झाले. ते सन १९७० मध्ये जुनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.हिवरगाव पावसा पंचक्रोशीतील मॅट्रिक पास होणारा पहिला विद्यार्थी श्रीकांत  भालेराव होय.त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून त्यांनी नोकरी केली.

त्यानंतर मुंबईला खाजगी कंपनीत लिपिक म्हणून नोकरी केली.रेल्वे वर्कशॉप परेल येथे लिपिक म्हणून नोकरी करत असताना नामांतराच्या चळवळीत तुरुंगवास व गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांची ती नोकरी गेली.त्यानंतर मुंबई बंदर बॉम्बे पोर्टस येथे लिपिकपदी नोकरी मिळाली.तेथे वर्ग दोन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले.

श्रीकांतजी आंबेडकर चळवळीतील लढाऊ पॅंथर - अहिल्यानगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील उत्कृष्ट संघटक व अभ्यासू नेतृत्व ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाते.आंबेडकर चळवळीतील रिपब्लिकन पार्टी इंडियाचे (आठवले)जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे व निष्ठेने जबाबदारी ते पार पाडत आहे.पॅंथर सारख्या लढाऊ संघटने पासून नामांतराचा लढा, विविध सामाजिक आंदोलने
,बहुजन समाजातील प्रश्नांवर लढा,कोरोना काळातील गोरगरिबांना संघटनेच्या मार्फत अन्नधान्य गरजेच्या वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात जपण्याचे  प्रयत्न त्यांनी केले.कोरोना काळात सारी मुंबई सैरभैर झाली होती यावेळी ते मुंबईवरून हिवरगाव पावसात आले.या कालावधीत समाजाशी सतत संपर्क साधून ते होते लॉकडाऊन मध्ये अनेक दिग्गज लोक,पुढारी घरात बसून होते.परंतु श्रीकांत भालेराव हे गावोगावी  खेडोपाडी,वाड्या वस्तीवर बहुजन समाजात,मागासवर्गीय  वस्त्यांवर जाऊन धीर देत होते.कोरोनाला घाबरू नका, सावधगिरी बाळगा,वाचला तर पुढे आणखी लढता येईल असा संदेश देत तरुणांमध्ये जनजागृती करत होते.शिव-फुले- शाहु- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार देखील त्यांनी केला,या काळातही अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे संघटन उभे केले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)
यांच्या शेकडो शाखांचे उद्घाटन कार्यक्रम यावेळी उत्साहात पार पडत,त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते निर्माण झालेत नव्या विचारांची फौज निर्माण करण्यात श्रीकांतजी अव्वल ठरले.नेहमी
कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे नेतृत्व रिपब्लिकन चळवळीत सर्व परिचित आहे. म्हणूनच त्यांना कार्यकर्ते घडविणारे नेतृत्व म्हटले जात आहे.

सामाजिक बांधीलकी जपत योगदान समाजकार्य -
हिवरगाव पावसा येथील सिद्धार्थ कृषी सहकारी पाणीपुरवठा योजनेची स्थापना केली.या महाराष्ट्रातील पहिल्या मागासवर्गीय कृषी 
पाणीपुरवठा योजनेस मंजूरी श्रीकांत भालेराव यांनी मिळवली.संगमनेर येथील प्रवरा नदीतून पाणी उचलण्याचा परवाना त्यांनी मिळविला.सदर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून २३५ एकर क्षेत्र ओलिताखाली आले.एकूण २१० सभासद असलेले मागासवर्गीय,
बहुजन समाजाची महाराष्ट्रातील सर्वात पहिली पाणीपुरवठा योजना म्हणून ओळखली जाते.सिद्धार्थ कृषी सहकारी पुरवठा योजनेला ५० टक्के शासकीय अनुदान मिळवून देण्यास श्रीकांत भालेराव यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सिद्धार्थ कृषी सहकारी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर उद्घाटनप्रसंगी सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांच्या सह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 सन १९९१ मध्ये देवगड विद्यालयास आठवी व नववीच्या वर्गास रिपाईच्या कोट्यातून मान्यता मिळवली.हिवरगाव 
पावसा येथे तालुक्यातील सर्वात मोठे समाज मंदिर दुहेरी 
अंदाजपत्रक करून ना.रामदास आठवले यांच्या सहकार्याने बांधले.गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावले. 

सन २००३ मध्ये कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या मार्फत श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पवळा यांचे नातभाचे कलकथित चांगदेव लहुजी भालेराव यांनी राज्यस्तरीय कला महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.हा कला महोत्सव ‌राज्यस्तरीय होता.त्याप्रसंगी राज्यभरातील तमाशा व नाट्य क्षेत्रातील नामवंत कलावंतांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन केले.
सन २०१८ मध्ये श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली महात्मा फुले, डॉ. आंबेडकर,राजश्री शाहू विचार मंच संचलित बौद्ध कला संस्कृतीक प्रशिक्षण केंद्रास भारत सरकारची मंजुरी प्राप्त झाली आहे.सदर प्रकल्पास सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत बौद्ध तिबेटिया अर्थसाह्य योजनेअंतर्गत मान्यता मिळालेला राज्यातील दुसरा व अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.सदर प्रकल्पाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.नामदार रामदासजी आठवले यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत
आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या भव्य सामाजिक सभागृहासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.या सभागृहाच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत चालू आहे.सदरच्या पवळा सांस्कृतिक सभागृहसाठी निधी मंजुरी करिता श्रीकांत भालेराव यांची महत्त्वाची भूमिका आणि योगदान राहिले आहे.

सामाजिक बांधीलकी जपणारे उच्च शिक्षित घराणे -
श्रीकांत भालेराव यांना आपल्या आई-वडिलांकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार मिळाले.वडील तबाजी भालेराव हे गावचे माजी सरपंच होते. तबाजी मारुती भालेराव यांनी आपल्या सर्व मुले-मुली यांना उच्च शिक्षण व चांगले संस्कार दिले.त्यामुळे कुटुंबातील सर्वच मुले उच्चशिक्षित आहे तसेच त्यांना उच्चपदावर नोकरी करण्याची संधी मिळाली.श्रीकांत भालेराव यांच्या पत्नी  सौ.नालिनी भालेराव या आरोग्य विभागात वर्ग दोनच्या अधिकारी पदावर सेवानिवृत्त झाल्या आहेत.मुलगा मंगेश भालेराव क्रिएटिव्ह डायरेक्टर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या कुटुंबाचे, गावाचे नाव झळकवत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडा चित्रपटांची निर्मिती झाली आहे.मंगेश भालेराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या चित्रपटाची निर्मिती झाली आहे.त्यांच्या सुन या आरोग्य विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून कार्यरत आहे.मुलगी माधुरी कांबळे आरोग्य विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.जावई सुधीर कांबळे सिव्हिल इंजिनिअर वर्ग दोन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.अशा प्रकारे श्रीकांत भालेराव यांचे कुटुंबीय उच्चशिक्षित उच्च पदस्थ प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते.

७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वाटचाल करताना नामदार रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यभर दौरे करत आहेत.ते रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमदनगर  जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.तसेच बंदर ट्रान्सपोर्ट अँड  डार्क वर्कर युनियन पदाधिकारी म्हणून कार्य करताना कामगारांसाठी प्रभावी लढा त्यांनी दिला आहे त्यात ते कामगारांच्या अनेक छोट्या - मोठ्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि कार्यरत असतात.

हिवरगाव पावसा येथील विकास कामात व जडण घडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.गावातील सर्वांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगांमध्ये ते नेहमी सहभागी असतात.हिवरगाव पावसा येथे १५ फेब्रुवारीला अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.राजकीय, सामजिक,शैक्षणिक,कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

जिल्ह्यातील व राज्यातील राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.अशा समाजभिमुख व्यक्तिमत्व असलेले तळागाळातील शोषित वंचित दुर्लक्षित व्यक्तीबरोबर त्यांची नाळ जोडलेली आहे. कारण त्याच घटकांना माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते धडपडत असतात अनेक कार्यकर्त्यांना घडविणारे आदर्श नेतृत्व म्हणून श्रीकांतजी भालेराव सर्वांना परिचित आहेत अशा राज्यस्तरावर काम करताना आपल्या जिल्ह्याचे,हिवरगाव पावसा गावाचे नाव राज्याच्या नकाशावर अधोरेखित केले आहे. विकासाची दूरदृष्टी असलेले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेतृत्वाला अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे हीच मंगल कामना.
-नितीनचंद्र चांगदेव भालेराव 
सचिव-कला सम्राज्ञी पवळा कला मंच,हिवरगाव पावसा,ता. संगमनेर,जि.अहिल्यानगर
मो.नं.९४०५४०४६४३
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!