राहुरी (प्नतिनिधी) तालुक्यातील वांजुळपोई येथील श्री.संगमेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब सखाहरी चोथे हे नुकतेच ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.त्यानिमित्त त्यांचा येथील शाळेत त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश महाराज पवार हे होते,तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे,टाकळीमियाचे लोकनियुक्त सरपंच राजेंद्र गायकवाड,टाकळी मियाचे माजी सरपंच किशोर मोरे टाकळीमियाचे शामभाऊ पवार,अप्पासाहेंब जाधव,लहानभाऊ जाधव,दगडू गल्हे,बाबासाहेब सिनारे , शिवाजी पटारे,उत्तमराव खुळे, गीताराम चोथे यांच्या उपस्थितीत हा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी दादासाहेब सखाराम चोथे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभले.त्यामुळे ३४ वर्ष नोकरीचा काळ आनंदाने पूर्ण करता आला.आज निवृत्त होत असून या नोकरीचा काळ नेहमीच आठवणीत राहील.सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य तसेच सर्व लक्ष्मीमीनारायण प्रतिध्ठान संस्था सर्व अध्यापक,शिक्षकेतर सेवक,व विद्यार्थी आणि श्री. संगमेश्वर माध्यमिक विद्यालय, वांजुळपोई यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला संपन्न झाला.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य दादासाहेब चोथे म्हणाले की माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत कुटुंबीयांची खंबीर साथ मिळाली.नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची देखील उत्तम साथ मिळाली. जीवनात अनेक संघर्ष घडले, संकटे निर्माण झाली पण वैचारिक तोल कधीही ढळला नाही.आई-वडिलांच्या शिकवणीचा आयुष्यावर खूप प्रभाव राहिला.आयुष्यभर श्रमाला मान दिला' अशा शब्दांत जीवन विषयक दृष्टिकोन त्यांनी यावेळी उपस्थितासमोर मांडला.उपस्थितांनी साश्रू नयनाने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार व श्रीमती. चक्रनारायण यांनी केले.
