श्रीकांत भालेराव यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने खंबीर साथ दिली- नामदार आठवले

Cityline Media
0
हिवरगाव पावसा येथे अमृतमहोत्सवी सोहळ्या निमित्त केंद्रीय मंत्री आठवले यांनी केला सन्मान 
संगमनेर(नितीनचंद्र भालेराव) 
संघर्षमय परिस्थितीत अडचणीच्या 
काळात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आदर,सन्मान करणे जबाबदारी समजतो.असंख्य कार्यकर्त्यांनी लाखमोलाची साथ दिली.अनेक आंदोलने यशस्वी केली.आंबेडकर चळवळ मोठी केली अशा कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे.श्रीकांत भालेराव यांनी प्रामाणिकपणे,निष्ठेने मला खंबीर साथ दिली आहे.अनेक जण आले आणि गेले पण श्रीकांत भालेराव माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शब्दात श्रीकांत भालेराव यांच्या कार्याचे कौतुक केले.

हिवरगाव पावसा येथील त्यांच्या जन्मगावी आणि घरी येऊन भालेराव यांना मानचिन्ह व सन्मानपात्र देऊन श्रीकांत भालेराव यांचा गौरव केला.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या अमृतमहोत्सवी प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे,उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,तालुका अध्यक्ष आशिष शेळके,कैलास कासार,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,रमेश श्रीखंडे,सिद्धार्थ खरात,विजय खरात,राजेश गायकवाड,सरपंच सुभाष गडाख,डॉ.प्रमोद पावसे,अशोक भालेराव,मंगेश भालेराव,नितीनचंद्र भालेराव,गणेश दावंगे हे उपस्थित होते. 

आंबेडकर चळवळ अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे जात आहे,अशा परिस्थितीतही कार्यकर्ते आणि समाजाची साथ मिळत आहे.समाजाच्या,कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष मणिपुर,पाँडिचेरी,नागालँड यासारख्या राज्यांमध्ये यश मिळवत आहे.चळवळीत जे माझ्याबरोबर आहेत त्यांचाही मी आदर करतो.जे माझ्या बरोबर नाहीत त्यांच्या बद्दल मला आदर आहे.श्रीकांत भालेराव यांनी चळवळीत मला मोलाची साथ दिली आहे. मुलुंड एकेकाळी आरपीआयचा बालेकिल्ला समजला जात असे,तेथे अनेक आंदोलने झाली.त्यात श्रीकांत भालेराव आघाडीवर असायचे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा व्यक्त केली आणि हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी झालेल्या दिमाखदार अभिष्टचिंतन सोहळ्याला मा.महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे,नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे,रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे,शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,वंचितच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, राजेंद्र गवांदे,माणिक यादव,अमित काळे, पप्पू बनसोडे,अबा चासकर,
यांच्या सह राजकीय,सामाजिक शैक्षणिक  क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला
अभिष्टचिंतन सोहळा यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार,युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे,डॉ.संदिप पावसे,डॉ.विजय पावसे, मथाजी पावसे,यादवराव पावसे,गणपत पावसे,रमेश पावसे,रमेश रूपवते,नितीनचंद्र भालेराव,गणेश दवंगे,वसंत भालेराव, गुलाब भालेराव, बाळू भालेराव,मारुती भालेराव शंकर भालेराव, दाविद भालेराव,
बाळासाहेब भालेराव,बच्चन भालेराव,दिपक भालेराव,राजेश भालेराव,संदेश भालेराव,शरद भालेराव,विकास दरोळे,सोमनाथ दवंगे,संजय भालेराव,विशाल भालेराव,रविंद्र भालेराव,सुनील भालेराव ,महेंद्र भालेराव,चंद्रकांत भालेराव, सुयोग भालेराव,संतोष भालेराव, संजय भालेराव,गौतम भालेराव ,रमेश रूपवते,वैभव गायकवाड,आनंद दारोळे,मुकेश भालेराव,लहानु भालेराव,समाधान भालेराव,मन्सूर इनामदार यांच्यासह रिपाइंचे जिल्हा व तालुका पदाधिकारी,कला सम्राज्ञी पवळा कला मंच,भीमशक्ती तरुण मित्रमंडळ,हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते,
ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!