ज्ञानाच्या प्रकाशासमोर अज्ञानाच्या अंधाराची काळीमा राहत नाही‌.

Cityline Media
0
*❤Imaginary work..!* 
✏️ *Medium-* Oil on canvas 
📏 *Size-* 30"× 36"
👉 *Art by-* @satyajeet_udawant
Available for sale ..!
.
 वसंत पंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा..!! 
.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। 
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
.
.
 चित्र निर्मितीविषयी थोडक्यात-
    माता सरस्वती या विषयावर अनेक प्रसिद्ध चित्रकार ( चित्रकार राजा रवी वर्मा पासून आतापर्यंतचे चित्रकार ) तसेच शिल्पकारांनी  उत्कृष्ट रित्या शिल्प-चित्र कलाकृती  चितारल्या आहेत.त्या चित्र-शिल्प कलाकृती  बघून त्यांच्या प्रेरणेने या विषयावर मला चित्र रेखाटण्याची इच्छा झाली. 
      माता सरस्वती, वाग्देवी, शारदा. ज्ञानाची इच्छा धरणाऱ्याला ज्ञानसंपदा प्रदान करणारी. तसेच विद्या, कला संगीत, आणि वाणीची देवता. ही श्वेत वस्त्रांमध्ये एकदम उज्वल असून तिचे वाहन शुभ्र हंस आहे. आणि मोर तिच्या बाजूला असतो. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख आयुधे सर्वत्र दिसतात. ही श्वेतपुष्प आणि मोती धारण करते. त्यामुळे श्वेत (पांढरा) रंग सरस्वतीचा प्रतीक मानला जातो. कारण ज्ञानाच्या प्रकाशासमोर अज्ञानाच्या अंधाराची काळीमा राहत नाही. हा श्वेतरंग पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतीक आहे. 

 या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मी हे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रासाठी मला माझे वडील *चित्रकार भरतकुमार उदावंत* आणि *चित्रकार रवि भागवत* यांचे मार्गदर्शन लाभले.या चित्राची साइज तीन फूट बाय चार फूट आहे. हे तैलचित्र मी तैल रंगात कॅनव्हासवर रेखाटले आहे. तुम्हाला हे चित्र कसे वाटले, प्रतिक्रिया नक्की कळवा.
-चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत
(९८८१०३१५८४)
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!