एस.एस.सी.परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस देणार
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव )- संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयास ओजस्वी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महंत एकनाथ महाराज पावसे यांनी अकरा हजार रुपये देणगी स्वरूपात नुकतीच मदत केली.त्याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.उगले, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,शिवसेना जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव, कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव हे उपस्थित होते.
देवगड विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराज बोलत होते,देव आहे हे श्रद्धा आहे पण अभ्यास न करता देवा मला परीक्षेत पास कर हे अंधश्रद्धा आहे.हा जन्म पुन्हा होत नाही त्यामुळे चांगले काम, चांगले कर्म या जन्मात करावे पुनर्जन्म होत नाही.तुम्ही केलेले सत्कर्म चांगले काम चांगले विचार हे समाजाच्या कायमस्वरूपी आठवणीत राहतात.त्यामुळे चांगले काम करत रहा,चांगला अभ्यास करा, उत्तम प्रगती करा ,देश सेवा करा, सेनेमध्ये जाऊन भारत मातेची सेवा आणि भारताच्या भूमीचे रक्षण करावे,उच्च शिक्षण घेऊन गावाचे नाव कुटुंबाचे नाव मोठे करावे असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
प्रसंगी देवगड विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवेल अशा प्रथम तीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच देवगड माध्यमिक विद्यालयास अकरा हजार रुपये देणगी स्वरूपात मदत केली या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री.नेहे,श्रीमती हांडे ,श्री.तातळे ,श्री.कुदळ,श्री.वाघ, श्री.माने ,श्री.थोरात ,श्री. राहणे यांच्यासह सर्व शिक्षक
कर्मचारी वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.
