तळेगाव दिघे बौद्ध विहार विस्तारासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
संगमनेर (प्नतिनिधी) तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बौद्ध विहाराच्या विस्तारासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा.यासाठी येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजकल्याण मंत्री नामदार संजय शिरसाठ यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली.
निधी अभावी या बौद्ध विहाराचा विस्तार अशक्य आहे.शिवाय तालुक्यातील तळेगाव दिघे हे गाव सर्वात मोठे आहे.येथील लोकसंख्या देखील लक्षणीय आहे.या पंचक्रोशीतील गावातील बौद्ध धर्मियांच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या या बौद्ध विहाराचा विस्तार लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी तिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आत्माराम जगताप सह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई येथे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.त्यावर मंत्री शिरसाठ यांनी हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांना दिले.
