आहिल्यानगर मध्ये 'जोडी तुझी माझी'सायकॉलॉजिकल म्युझिकल कौन्सिलिंग रियालिटी शो चे आयोजन

Cityline Media
0
पती पत्नीला पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पाडणारा अफलातून साक्षात्कार त्वरीत सामील व्हा.

आहिल्यानगर (प्रतिनिधी) लग्नाची बेडी,ही तर आयुष्याच्या सुखाची शिडी, सोडवता आली पाहिजे फक्त संसारातील कोडी, सोडवता आली पाहिजे मग म्हणता येईल आपल्याला खरी तुझी माझी जोडी..!पती पत्नी मधील हरविलेल्या किंवा हरवत चाललेल्या प्रेमाला पुन्हा उजाळा देऊन त्यातला खरा आनंद लुटण्यासाठी समुपदेशक ठरणारा असा महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला जोडी तुझी माझी हा म्युझिकल कौन्सिलिंग
रियालिटी शो रविवार ‌दि.२३ फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता अहिल्यानगर येथील आनंदधाम समोर असलेल्या मार्केट यार्ड मागील केशर गुलाब कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती ‌आयोजक सुहासभाई मुळे यांनी दिली.

पुणे येथील रुपक कला मंच प्रस्तुत जोडी तुझी माझी हा एक आगळावेगळा सायकॉलॉजीकल म्युझिकल कौन्सिलिंग शो असुन तो अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेला आहे.या शोचे संकल्पक व सादरकर्ते प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट  ‌हिप्रोटिस्ट कौन्सिलर डॉ.जी.कुमार असून संयोजक व निवेदक हर्षद रुपवते आहेत. केवळ पती-पत्नी जोडीसाठीच खास पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पाडणारा एक अनोखा साक्षात्कार, एक अफलातून अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरू असून अहिल्यानगर मधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
फ्री पासेस/मोफत नोंदणीसाठी 8668492100 या नंबर व्हाट्सअप करा प्रवेश मोजके मर्यादित आहे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!