मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या रुग्णालयात कार्यान्वित झाला सभासद आरोग्य विभाग

Cityline Media
0

-ज्येष्ठ फिजिशियन डॉ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले लोकार्पण
-शिवजयंतीचे औचित्य साधत फिरते रक्तसंकलन वाहनाचे उद्घाटन.
नाशिक (दिनकर गायकवाड) मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आडगाव येथील डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सभासदांसाठी स्वतंत्र आरोग्य विभाग कार्यान्वित झाला असून या सभासद आरोग्य विभागाचे आणि फिरते रक्तसंकलन अत्याधुनिक व सुसज्ज वाहनाचे लोकार्पण आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले.
नाशिक शहरातील ज्येष्ठ फिजिशियन डॉ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते  व  सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  सभासद आरोग्य विभागाचे व फिरते रक्तसंकलन वाहनाचे उद्घाटन झाले.यावेळी आयोजित  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी,संचालक ॲड.संदीप गुळवे, विजय पगार, शिवाजी गडाख, ॲड.रमेशचंद्र बच्छाव,ॲड.लक्ष्मण लांडगे,शोभा बोरस्ते, नंदकुमार बनकर,रमेश पिंगळे,सेवक संचालक सी.डी. शिंदे,माजी अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे,अरविंद कारे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ सभासद भागवत बाबा बोरस्ते आदींसह आडगाव व नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ सभासद उपस्थित होते.
 
प्रारंभी कर्मवीरांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ.सुधीर भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत कवडे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.
 
वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला उजाळा दिला व मविप्र रुग्णालयात सभासद आरोग्य विभाग सुरु करण्याचा निर्णय अभिनंदनीय असल्याचे सांगितले. 
   प्रमुख पाहुणे डॉ.अभिमन्यू पवार यांनी मविप्र रक्तपेढीचे कार्य कौतुकास्पद असून नवीन रक्तसंचलन वाहनामुळे रक्तपेढीचे रक्त संचलनाचे काम मोठे होण्यास मदत होईल,असे सांगून डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय क्रमांक एकचे कसे होईल, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे,मविप्र सभासदांसाठी स्वतंत्र आरोग्य विभाग सुरू करणे हा स्तुत्य निर्णय असून सरचिटणीस ॲड.ठाकरे व त्यांची कार्यकारिणी सूचना आणि निर्णयांची अंमलबजावणी  करत आहे.असे सांगत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

     सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की,समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे.ते आपण करत आहोत. मविप्र समाजाला १११ वर्षाचा इतिहास आहे.सभासद आरोग्य विभाग ही कल्पना जुनी होती,ती आज या कार्यकारिणीने पूर्ण केली,संस्थेच्या प्रगतीसाठी सीएसआर फंड,माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून निधी प्राप्त होत आहे.डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून  दर्जेदार सोयी सुविधा, अतिविशेष रुग्णांना दिल्ली- मुंबईप्रमाणे आपल्या मविप्र रुग्णालयातही  विशेष कक्ष  सुरु करण्याचा मानस आहे,असे सांगत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. 
       सूत्रसंचालन डॉ.वृषाली बस्ते, डॉ. शुभांगी वानखेडे, डॉ. विद्या काळे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सभासद, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते
असा आहे मविप्र सभासद आरोग्य  विभाग
आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविदयालयाच्या मविप्र रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेल्या सभासद आरोग्य विभागात एकूण २० बेड असणार आहेत, तर सहा बेड या अतिदक्षता विभागाप्रमाणे असतील,या विभागात २४ तास निवासी डॉक्टरांचे निरीक्षण आहे,प्रत्येक  रुग्णाला स्वतंत्र परिचर्या सेवा,आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार जेवणाची व्यवस्था, नातेवाईकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आला आहे.सभासदांना या विभागात एकाच ठिकाणी रुग्णालयातील सर्व आरोग्य व्यवस्था,दर्जेदार सुविधा  एक खिडकी योजनेप्रमाणे उपलब्ध होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!