शिवजयंतीचे औचित्य साधत विविध विकास कामांचे लोकार्पण
नवी मुंबई (प्नतिनिधी) सालाबाद प्रमाणे नवी मुंबईतील रबाले येथील प्रभाग १९,२० मधील महिला बचत गट व तमाम सजग कार्यकर्ते यांच्या स्वयंस्फूर्तीने नुकताच येथे हळदी कुंकू समारंभ व महिला संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रसंगी पालकमंत्री तथा वनमंत्री लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते हस्ते भीमनगर पुतळा न.दोन येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरांचे देखील लोकार्पण देखील होणार आहे.तसेच विविध भागातील रस्ते,दुरुस्ती, नवीन निर्मिती जलकुंभ व पाणी वितरण व्यवस्था अशा विविध लोकोपयोगी पायाभूत विकास कामांचे भूमिपूजन होणार असल्याचे कळते.
मागील चार दशकांपासून माजी महापौर सुधाकर सोनवणे,रंजना सोनवणे व त्यांच्या कन्या डॉ.गौतमी साबळे या रबाले येथील प्रभाग क्रमांक १९,२० मधील प्रत्येकाच्या कुटूबांचा एक आधारवड आणि अविभाज्य भाग झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व दुरदृष्टीचे खऱ्या अर्थाने जीवन जगताना अंमलात आणले पाहिजे.असा होरा प्रत्येकाचा असला पाहिजे आणि याच विचारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंतीचे औचित्य साधून यावेळी येथे महिला संकल्प मेळावा आयोजित करुन महिला सबलीकरण हा नुसता विचार नाही ती एक आपल्या जुन्या गौरवाची परंपरा आहे आणि आता गरज बनताना दिसतेय.स्त्री ही केवळ सौंदर्य नाही ती बुद्धी शक्ती आणि प्रेरणादायी अस्तित्व असल्याची खुण आहे.हे त्यांनी सर्वांना आपल्या कृतीद्वारे पटवून दिले आहे.स्वावलंबी स्त्री म्हणजे कुटुंब समाज आणि राष्ट्राची खरी ताकद हा विश्वास त्यांनी प्रभागातील सर्व स्त्रिया मध्ये निर्माण करण्याचा संकल्प केला,संकल्प शिक्षणातून परिवर्तनाचा या माय माऊलींच्या मनामध्ये रुजवुन खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या यांच्या प्रयत्नांना यावेळी प्रभागातील हजारो महिलांनी कायम उदंड प्रतिसाद दिलेला आहे.
प्रभागात झालेली विविध विकास कामे हे याच विश्वासाचे प्रतीक आहे.म्हणुनच सुधाकर सोनवणे हे या प्रभागातील तळमळीचे लाडके मामा सर्व लाडक्या बहिणीचा भाऊ बनले आहे असा सुर उमटत आहे.