स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिला होता आंदोलनाचा इशारा
येवला (प्नतिनिधी) येवला तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी असुन येथील शेतकरी चांगल्या प्रकारे शेती पिकवतात मात्र वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे,नियमामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त होता वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या नियमावर बोट ठेवून येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी नुकताच आंदोलनाचा इशारा दिला होता.
येवला येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महेंद्र पगारे यांनी म्हटले आहे होते की शेती पंपासाठी रात्रीची वीज नको तो वीजपुरवठा दिवसा करा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करु येवला तालुक्याला ग्रामीण भागात मोठा प्रमाणात शेतकरी असून शेतकरी बांधव शेती चांगल्या प्रकारे शेती पिकवतात त्यामध्ये सर्व प्रकारचा भाजीपाला फळ, भाज्या मका गव्हु हरभरा कांदे काढतात तसेच पिकांची गुणवत्ता देखील अतिशय चांगली असते.
आता सध्या शेतात गव्हु हरभरा कांदे मका असून मका व गव्हु पिके मोठी झाल्यामुळे उंदीर घुस यांची संख्या वाढत आहे त्यामुळे गांडुळ साप हे विषारी,बिन सर्प रात्री बाहेर पडतात.तरी देखील शेतकरी बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता येते शेती पिकवतात
परंतु त्यातच खेदाच बाब म्हणजे वीज विद्युत वितरण कंपनीकडून वीजेचे वेळा पत्रक अतिशय चुकीचे आहे ते असे कि एक आठवडा सकाळी ८ते४ वाजेपर्यत एक आठवडा सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यत तर एक हप्ता मध्यरात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यत म्हणजे दोन आठवडे रात्री शेतकरी बांधवांना आपला जिवाशी खेळत मका व गव्हु सारख्या पिकाला पाणी भरावे लागते २४ तासापैकी ८ तास वीज व ती ही रात्रीची विद्युत वितरण कंपनीची हि मनमानी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होत असुन शेतकरी बांधवांचे हे एक प्रकारे शोषणच केले जात आहे.आता सध्या पाण्याची पातळी देखील खोल गेली असून दोन ते तीन तास पाणी मोटर चालु शकतात
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे निवेदन प्राप्त होताच तहसीलदारांनी संबधित आधिकारी यांना लेखी पत्र देऊन कारवाईचे आदेश देताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलिस उपनिरीक्षक उमेश बोरसे यांनी महावितरण कंपनीच्या आधिकारी यांना संपर्क करून रात्री पोलीस ठाण्यात याबाबत बैठक बोलावली होती यावेळी मुख्य अभियंता आर. एम.पाटील यांनी ताबडतोब आदेश करून वेळापत्रकात फेरबदल करून महेंद्र पगारे यांना लेखी पत्र देऊन आंदोलन स्थगित करा अशी विनंती केली मागणी मान्य झाल्यामळे महेंद्र पगारे यांनी आधिकारी यांचे आभार मानून आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले यावेळेस उप कार्यकारी अभियंता एम.डी.जाधव,अतुल पैठणकर तसेच महेंद्र पगारे विजय घोडेराव विनोद त्रिभुवन सुरेश खळे इलियाज पठाण उपस्थित होते.
