फाईव्ह जी नेटवर्क विस्तारात भारत आघाडीवर; युरोपियन देश ‌पिछाडीवर

Cityline Media
0

 
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
 युरोपीय देश नवीनतम तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर असतात पण आता भारत नव तंत्रज्ञानात आघाडी घेत आहे. ५जी स्टँडअलोन नेटवर्कच्या विस्तारात चीन आणि भारत देशांनी लक्षणीय प्रगती केली असून फाईव्ह जी नेटवर्क विस्तारात भारत अव्वल स्थानी पोहोचले आहे तर युरोपियन देश ५जीचा विस्तार करण्यात मागे राहिले आहेत.
Ookla च्या २०२४ च्या चौथ्या तिमाहीच्या अहवालानुसार, अमेरिका,चीन आणि भारताच्या तुलनेत युरोपीय देशांमध्ये ५जी विस्ताराचा वेग खूपच मंद आहे.

Ookla ने ५जी स्टँडअलोन (SA) नेटवर्क्सच्या जागतिक रोलआउटबाबतचा अहवाल सादर केला आहे.त्यानुसार ५ जी नेटवर्क्सचा जागतिक विस्तार मंदावला आहे स्पीडटेस्ट सॅम्पल शेअरच्या आधारे, चीनमध्ये ५ जीच्या विस्ताराच्यचा वेग ८० टक्के असून हा देश पहिल्या क्रमांकावर आहे,तर भारतात ५ जीच्या विस्ताराचा वेग ५२ टक्के असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.अमेरिका तिसऱ्या स्थानावर असून अमेरितेकत ५जी च्या विस्ताराच्यचा वेग २४ टक्के आहे. युरोपमधील १ टक्के क्षेत्रांसाठीच ५जी SA चा वापर केला जातो.

५जी SA डाउनलोड स्पीडमध्ये युरोप देखील मागे आहे. युरोपमध्ये सरासरी वेग २२१.१७ एमबीपीएस होता,तर अमेरिकेत ३८४.४२ एमबीपीएस आहे. आशिया पॅसिफिकमध्ये २३७.०४ एमबीपीएस आणि इमर्जिंग आशिया पॅसिफिकमध्ये २५९.७३ एमबीपीएस वेग नोंदवण्यात आला.

५जी SA विस्तारात भारत आघाडीवर आहे, २०२४ च्या चौथ्या तिमाहीत उपलब्धता ५२ टक्के आहे,जी अनेक प्रगत बाजारपेठांपेक्षा जास्त आहे. ओकलाच्या मते,भारतातील ५ जी एसए रोलआउटची गती टेलिकॉम ऑपरेटर्सच्या उच्च गुंतवणुकीमुळे आहे.

रिलायन्स जिओकडून स्टैंडअलोन (SA) नेटवर्क रोलआऊट केल्या जात आहे. तर भारती एअरटेल नॉन-स्टँडअलोन नेटवर्कवर काम करतेय. भारतात, २०२४ च्या चौथ्या तिमाहीत ५जी SA डाउनलोड स्पीड २६०.७१ एमबीपीएस होता, जो चीनमध्ये २२४.८२ एमबीपीएस होता, तर जपानमध्ये ५जी स्पीड २५४.१८ एमबीपीएस होता युरोपमध्ये ५ जीचा वेग २२१.१७ एमबीपीएस पेक्षा जास्त आहे. ५जी SA वर डाउनलोड गतीमध्ये भारत आघाडीवर आहे.त्याची सरासरी लेटन्सी ५२.२४ मिलीसेकंद आहे आणि अपलोड स्पीड १५.६९ एमबीपीएस आहे.

डाउनलोड स्पीडच्या बाबतीत, २०२४ च्या चौथ्या तिमाहीत ५५जी एसएचा सरासरी डाउनलोड स्पीड युरोपमध्ये ५७ टक्के जास्त आणि चीनमधील एनएसए नेटवर्कपेक्षा ८४ टक्के जास्त होता.ओकलाच्या अहवालानुसार,भारत,चीन आणि अमेरिका ५ जी उपलब्धता आणि कामगिरी या दोन्ही बाबतीत आघाडीवर आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!