पारनेरचे आमदार काशीनाथ दाते यांची एकलव्य जयंतीला उपस्थिती
वरवंडी (संपत भोसले)विर एकलव्य आयुष्यभर शिकणाऱ्या तत्वज्ञानाची प्रेरणा आहे एकलव्यांची इतिहासातील उपस्थिती आम जनतेसाठी उत्सव असल्याचे दिसते,या विर एकलव्य पर्वात बोधवाक्य आहे की तुम्ही स्वतः निर्माण करा त्यांची हि दंतकथा महत्वाची साक्ष आहे.अनेक साहित्यिकांनी त्यांचे विचार मानवाला पुढे घेऊन जाणारे विचार मांडले असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
तर पारनेरचे आमदार काशीनाथ दाते म्हणाले की हरियाणा राज्यातील गुरूग्राम शहरातील सेक्टर ३७ मधील खंडसा गावात एकलव्याच्या सन्मानार्थ एक विर एकलव्य स्मारक आहे याच स्मारक आणि पुर्वीच्या मंदिरात एकलव्याने आपला अंगठा कापला आणि गुरू द्रोणाचार्यीस अर्पण केले याच ठिकाणी विर एकलव्याने अनेक वर्षे स्वंय अध्ययनाच्या शिस्तबद्ध कार्यक्रम सुरू केला पुतळ्याला आपले गुरू मानले असे आमदार काशीनाथ दाते म्हणाले.
निमित्त होते संगमनेर तालुक्यातील पठारावरील खांबे गावात विर एकलव्य जयंतीचे,यावेळी मोठ्या उत्साहात विर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली.प्रसंगी आमदार खताळ आमदार दाते सरपंच रविंद्र दातीर, उपसरपंच भारत मुठे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी कापडी,गणपत दातीर,अण्णा भांगे संतोष कापडी,नामदेव कापडी शिवनाथ दातीर बाजीराव दातीर राहुल दातीर,ज्ञानदेव कापडी बाळासाहेब दातीर सुशांत जाधव, चंद्रकांत आहेर, गणेश आहेर संदिप भांगरे, सुभाष गायकवाड यांच्यासह एकलव्य संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
पुढे बोलताना आमदार खताळ म्हणाले की, एकलव्याच्या सन्मानार्थ भारत सरकार भारतीय आदिवासींसाठी एकलव्य मॉडेल, निवासी शाळा मॉडेल शाळा चालवते तसेच कर्नाटक सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकलव्य पुरस्कार स्पर्धकांनी केला जातो.
आमदार अमोल खताळ व पारनेचे आमदार काशीनाथ दाते हे प्रथमच माझ्या छोट्याश्या खांबे गावाला भेट देण्यासाठी आले गावकऱ्यांच्या आणि माझ्यासाठी अभिमानास्पद आहे,खांबे गावच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी दोन आमदार येथे आले असे गौरवोद्गार सरपंच रविंद्र दातीर यांनी काढले