महाशिवरात्री निमित्त चणेगावात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

Cityline Media
0


चणेगाव (इंद्रभान ढमक) संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच चणेगाव व पंचक्रोशीतील लोकांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.
संगमनेर येथील आधार रक्तपेढीच्या वतीने करण्यात येथील श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर  प्रांगणात २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ३ या वेळात रक्तदान शिबीर आयोजित केले असून या सामाजिक उपक्रमातून चला करूया रक्तदान वाचून कोणाचे तरी प्राण असे ब्रीदवाक्य घेऊन संयोजकांनी प्रचार केला.
चणेगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्ताना यावेळी आवाहन करण्यात आले की या सप्ताह निम्मित संगमनेर येथील आधार रक्तपेढी यांच्या सहकार्यातून हे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले असून.सर्वांनी रक्तदान करून मोलाचं सहकार्य करावे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याच्या कुटुंबाला भविष्यात केव्हाही रक्ताची गरज भासल्यास आधार रक्तपेढी मार्फत वीणा रक्तदाता व मोफत रक्तसेवा पुरवली जाईल असे सांगण्यात आले.

 यावेळी रक्तदात्यांच्या तपासण्या केल्या जातील ते रिपोर्ट देखील रक्तदात्यांना मिळेल,रक्तदान श्रेष्ठ दान असून आरोग्यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!