शालेय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाणी पुरवठा कामाला आरंभ
वरवंडी (संपत भोसले) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरवंडी येथील थापलिंग ग्रुप हा नेहमीच समाजहिताला महत्व देत आला आहे,त्यातच या ग्रुपने येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्यध्यापकांना प्रजासत्ताक दिनी पिण्याच्या पाणी सोयीचे आश्वासन दिले होते आणि अखेर या आश्वासनांची पूर्तता केली.
लोकहितासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुप मधील दत्तात्रय सोन्याबापु वर्पे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिनी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक काकासाहेब देवराम तळेकर यांनी मागणी केली होती की मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाजूला चारशे फुटांवर असलेल्या कार्यकारी सोसायटीच्या बोरचे पाणी पिण्यास मिळावे परंतु खर्च कोण करणार अशी चर्चा चालू होती असे लक्षात आले असता गावातील स्थापलिंग ग्रुप मधील काही युवक पुढे सरसावले व त्यांनी त्या पाण्याची जबाबदारी स्विकारली त्यातील दत्तात्रय वर्पे यांनी पाच हजार रुपये किमतीचे पाईप आणून दिले यानंतर गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत पाईप लाईन खर्च आम्ही करतो असे सांगून आज अखेर कामास आरंभ झाला यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक उपस्थित होते कैलास बबन वर्पे यांनी या कामाची जोडणी व पूर्ण पाणी टाकीत पडेल याची जबाबदारी स्विकारत मदतीचा हात पुढे सरसावला.गावातील तरुण एकत्र आल्यास गावचा विकास नक्कीच होतो अशी चर्चा वरवंडी गावामध्ये सर्वत्र चालू आहे.