व्यथा वेदनेला नामदेव ढसाळांनी परिवर्तनाच्या लढाईत अव्वल केले-हृदयमानव अशोक

Cityline Media
0
[नामदेव ढसाळ जयंती दिनी पुण्यात रंगले विद्रोही कवी संमेलन,राज्यातून आलेल्या कवींचा विद्रोही आविष्कार सादर]

पुणे (प्नतिनिधी) रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यानो, आता या शहरा शहराला आग लावत चला,तूही यत्ता कंची,माणसाने गावे माणसाचे गाणे,हे स्वातंत्र्या,आदी कवितेतून जगणं मांडणाऱ्या तर गोलपिठा,मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले गांडू बगीच्या, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे,प्रिय दर्शनी आदी कविता संग्रहातून व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या,जगभरातील विविध भाषात ज्यांच्या कविता अनुवादित झाल्या, ज्यांना विद्रोहाचा ज्वालामुखी,महाकवी संबोधलं गेलं अशा शोषित, पीडित,वंचित आणि दुर्लक्षित घटकांच जगणं मांडून साहित्याला एक वेगळी शैली, उंची देणाऱ्या व सामाजिक चळवळीला लढण्याची गती देणाऱ्या पॅंथर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने निमंत्रितांच्या विद्रोही कवी संमेलनाचे व "पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ स्मृती" पुरस्काराचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक कलादिग्दर्शक संतोष संखद,संमेलनाध्यक्ष कवी,लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक,स्वाभिमानी रिपब्लिकन महासभाचे संस्थापक, अध्यक्ष हरेशभाई देखने, पुणे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे, स्त्री चळवळीच्या अभ्यासक ॲड. अर्चना मोरे, कवयित्री पुष्पा क्षिरसागर, स्वा. रि. म. चे उपाध्यक्ष ॲड.रूपाली हरणशिकारे,सचिव ॲड.संगीता भालेराव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नामदेव ढसाळ यांचे स्मरण करताना मान्यवरांनी त्यांच्या विविध आठवणींना आपल्या अविष्कारातून उजाळा दिला. 

आपल्या अध्यक्षीय मनोगतात हृदयमानव अशोक यांनी ढसाळ यांच्या व्यापक्तेचा आढावा घेतला. व्यथा वेदनेला नामदेव ढसाळांनी परिवर्तनशील प्रसिद्धी दिली अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.
जितेन सोनवणे, बाळासाहेब कदम, संजीवनी राजगुरू, सुभाष गवळी,दिलीप वाघमारे,वृषाली कदम- वीरगुर्जर, अँड.आनंद कांबळे, रवि भवार, सेवक थोरात, सतीश वाळेकर, ॲड.उमाकांत आदमाने या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना "पद्मश्री पॅंथर नामदेव ढसाळ स्मृती पुरस्कार" देऊन प्रसंगी गौरविण्यात आले. 
निमंत्रितांच्या कवी संमेलनात नामदेव ढसाळ यांना कवितेतून अभिवादन करण्यात आले. रवी कांबळे, राणी हिराबाई गहिनीनाथ, अमोल घाटविसावे, असित मेश्राम, रंजना कांबळे, शुभा लोंढे, किरण तायडे, गजानन उफाडे, काजल आठवले, युवराजनी सोनवणे,आदी सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पंचवीसहून अधिक कवींनी बहारदार रचना आणि कविता सादर केल्या. 
ॲड.प्रवीण कोल्हे, ॲड.शितल कोल्हे,निर्मला देखणे यांनी या सोहळ्याचे नियोजन केले.संदीप साळुंखे, दिलीप पालवे,विजय हरणशिकारे, सोनू काळे सह संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सागर वाघमारे, कविता काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.प्रवीण कोल्हे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!