चणेगावच्या उपसरपंच पदी सौ‌.सुनिता दिघे यांची बिनविरोध निवड

Cityline Media
0
चणेगाव (विलास दिघे)संगमनेर तालुक्यातील चणेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ.सुनिता अण्णासाहेब दिघे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली यावेळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.अनिता दिघे राजकारणात सक्रिय असुन यावेळी शेतकरी विकास मंडळाचे नेते शहाजी खेमनर तसेच संगमनेर शाप्रोचे संचालक डॉ.विठ्ठलदास आसावा यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या या सत्कार समारंभ प्रसंगी सौ.सुनिता अण्णासाहेब दिघे यांच्या बिनविरोध निवडीची सूचना सौ.सुनिता राजेंद्र खेमनर यांनी मांडली तर सौ.स्वाती गुळवे यांनी त्यास अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल खेमनर यांनी केले प्रसंगी अनिल पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले‌.यावेळी कार्यक्रमासाठी सरपंच सौ.भाग्यश्री खेमनर ग्रामसेविका सौ.रेखा पठारे ग्रामपंचायत प्रतिनिधी गणेश पाटोळे,विलास दिघे, विठ्ठल दिघे अनिल दिघे अप्पासाहेब दिघे आबासाहेब गुळवे राजेंद्र खेमनर सचिन भोसले सतिश दिघे शंकर हजारे विजय गुळवे,सुभाष गुळवे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!