शिर्डीतील रक्तरंजित शनिवारी दोन जणांचे खुन
शिर्डी (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.येथील अन्नछत्रामुळे गुन्हेगारी फोफावत आहे.असा देखील एक राजकीय सुरू निघत आहे.
शनिवारची पहाट ही शिर्डीतील रक्तरंजित पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कामगारांचा मृत्यू झाला तर त्यात जखमी झालेल्या एकावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे.
या घटनेतील सुभाष घोडे हे मंदिरातील कर्मचारी असून ते कामावर येत होते तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी कामावरून घरी निघाले होते.कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते.त्यांच्यावरही हा प्राणघातक हल्ला झाला.पहाटे चार ते पाच च्या दरम्यान विमानतळ रस्त्यावर विविध ठिकाणी या घटना घडल्या.मोटर सायकल असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली.तरीही इतक्यावरच ते न थांबता विकृत मनोवृत्तीतुन हल्लेखोरांनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले.यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघात असल्याचे सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने नातेवाईकांनी व नागरिकांनी संताप व्यक्त केला.जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा निर्धार करीत मयताच्या नातेवाईकांनी शिर्डी नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
