डोंबिवलीतील पेरियार मिशनचे दिपक भालेराव यांचे मत
सातव्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांच्या आदेशाने हजारो बौद्ध भिक्खूच्या कत्तली करण्यात आल्या तेव्हा धम्म लयास गेला होता.पुढे आद्य शंकराचार्यीनाच प्रछिन्न बुद्ध म्हणू लागले,परंतु आधुनिक युगात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरामुळे बुद्ध धम्म पुन्हा पुर्नर्जीवित झाला.मग इथली व्यवस्था तथागत गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार आहे.म्हणून खोटा आणि खोडचळ प्रचार नेहमी करित असते.
आपले संत,गुरू,महापुरुष आपला गौरवशाली इतिहास दैववादी किंवा ब्राम्हणीकरण करून मूळ हेतू नष्ट करणे हे ब्राम्हणी षडयंत्र आहे.बौद्धधर्मचा मूळपायाच सामाजिक समता आणि न्याय बंधुता यावर उभा आहे.ब्राम्हणी धर्मचा मूळपाया सामाजिक भेदभाव आणि शोषण आहे ,हा बौद्ध धर्म आणि ब्राम्हणी धर्म मधील मूळ फरक आहे.
देशभरात आजही बौद्ध वास्तू, स्तूप,आणि विहारवर मानसिक गुलामी स्विकारल्यांनी अतिक्रमण करून मंदिर मोठ्या संख्येने पाहायला मिळतात! इतकेच नाही तर बौद्ध साहित्यात ब्राम्हणवाद्याने भेसळ करण्याचा प्रयत्न केला.भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित जर कोणी केला असेल तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मग या कार्यक्रमात बाबासाहेबांचा फोटो का नाही?प्रयागराज मधील ह्या कार्यक्रमातील बौद्ध भिक्खू आहेत तरी कोण? कोणत्या विचारधाराचे आहेत? असा प्रश्न समाज माध्यमावर आज विचारला जातोय.तेथील भिक्खूची ओळख असणे तितकेच गरजेचे आहे.हे नकली भिक्खू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ब्राम्हणी धर्मच्या गुलामी कडे नेण्यासाठी हा कार्यक्रम? नसेल ना असा प्रश्न निर्माण होतोय.आज कोणत्या उद्देशाने हा कार्यक्रम होत आहे?कार्यकर्त्यांनी सावध होणे तितकेच महत्वाचे.भगवा रंग मुळात बौद्ध धम्माचा आहे,बौद्ध साहित्यात भगवा,भगवान,शब्द मोठया प्रमाणात आढळतो हे सुद्धा आपण विसरता कामा नये.
-दिपक भालेराव
