श्रीरामपूर (दिपक कदम)भगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत होते असे प्रतिपादन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथे आयोजित केले.
सालाबादप्रमाणे या वर्षी भगवान विश्वकर्मा जयंती सचिन कदम व त्यांच्या परिवारातर्फे मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये लोकमान्य टिळक वाचनालयासमोर आनंदाने साजरा करण्यात आला.प्रारंगी भगवान विश्वकर्मा यांची आरती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे तसेच आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांच्या हस्ते करत इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण करण्यात आली.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी सांगितले की संपूर्ण विश्वाचे रचता भगवान विश्वकर्मा यांनी मागील काळामध्ये ज्या अद्भुत वास्तू निर्मिला त्या खूप आश्चर्यकारक होत्या पण त्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक होत्या त्या वास्तूची निर्मिती करताना निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे,त्यामुळे या क्षेत्रात जे लोक काम करत आहे त्यांनी पण भविष्यामध्ये निसर्ग पूरक वास्तू कशा निर्माण करता येतील व आपला निसर्ग व पृथ्वी यांना अजून अनेक वर्ष कसे जीवदान देता येतील त्यासाठी काम करणे गरजेचे आहे हीच खरी त्यांना आदरांजली होय असे यावेळी श्री बडदे म्हणाले.या महाआरतीनंतर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे ,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, सचिन कदम ,सौ प्रिया कदम मनसेचे जिल्हाप्रमुख बाबा शिंदे, ॲड.सुनील शेळके, शिवसेनेचे प्रमुख रमेश घुले,लखन कुरे,सुनील पगारे ,रवी शिरसाठ संतोष डहाळे, रवी जाधव, सुरेश बारस्कर,गणेश वाकचौरे,दीपक यशवंत ,सचिन शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
