श्री.क्षेत्र खंडोबा देवगड यात्रोत्सव ‌सुरु

Cityline Media
0
श्री.क्षेत्र खंडोबा देवगड यात्रा
उत्सवा निमित्त नामवंत कलावंतांच्या स्वागताला हिवरगाव पावसा कला नागरी सज्ज 


माघ पौर्णिमा उत्सवा निमित्त कला,सांस्कृतिक,क्रिडा,
कृषी कार्यक्रमांची पर्वणी


संगमनेर (नितीनचंद्र भालेराव) प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट,हिवरगाव पावसा येथे माघ पौर्णिमे निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे.राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत यात्रा उत्सवा निमित्त कला,क्रीडा,कृषी, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पर्वणी ठरणार आहे.

 खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा माघ पौर्णिमे यात्रा उत्सव मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी असा चार दिवस साजरा होणारा आहे.मंगळवारी देवाची काठी भव्य दिव्य पालखी छबिना मिरवणूक होईल,बुधवारी सकाळी ७ ते ८ वाजता ग्रामदैवत हनुमान मंदीरात ग्रामदैवत पुजन, सवाद्य काठी पालखी मिरवणूक खंडोबा मंदिरापर्यंत येईल,सकाळी ८ ते ९ मान्यवरांच्या हस्ते श्री.ची महापुजा, मंगलस्नान,महाआरती होईल.देवगड कृषी प्रदर्शन व अश्व घोडे खरेदी विक्रीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा देवगड अश्व बाजार व प्रदर्शन उद्घाटन होईल.

बुधवारी रात्री ९ ते १२ "नटरंगी नार उडवी लावणीचा बार"हा सुरेखा पुणेकर यांच्या मराठमोळ्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.बुधवारी रात्री रात्री ९ ते १२ व गुरुवारी सकाळी ९ ते १२ वाघ्या मुरळी चां जागरण गोंधळ कार्यक्रम होईल.
गुरुवारी दुपारी ३ ते ६ वाजता श्री क्षेत्र देवगड केशरी हा भव्य कुस्त्यांचा हंगामा होणार आहे, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  गदा, द्वितीय क्रमांक पारितोषिक ट्राॅफी,तृतीय क्रमांकास मानाचा फेटा असे विजेत्यांना बक्षीसे देणार आहे.
गुरुवारी संध्याकाळी ९ ते १२ या वेळेत सुप्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत विठाबाई भाऊ  (नारायणगावकर) यांचा मोफत लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल व शुक्रवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत तमाशा कलावंत हजेरीचा कार्यक्रम होईल. 

शुक्रवारी रात्री ९ ते १२ वाजता  शेतकऱ्याची संघर्षगाथा सांगणारा नवरदेव हा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन मोठया प्रमाणात केले आहे.हिवरगाव पावसा कला नागरी 
राज्यभरातून येणाऱ्या कलावंताच्या स्वागताला सज्ज झाली आहे.
संगमनेर तालुक्यासह राज्यातून  येणाऱ्या खंडोबा भक्तांसाठी ही यात्रा खास पर्वणी ठरणार आहे.तरी या माघ पौर्णिमा यात्रा उत्सवाला उपस्थीत राहून दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रेची शोभा वाढवावी आवाहन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष,
उपाध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ व यात्रा उत्सव समिती,हिवरगाव पावसा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!