छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अजिज पठाण यांचा इशारा
मुस्लिमांची सर्व बाजूने कोंडी करावयाची असा भारतातील खऱ्या शासकांचा डाव आहे तो प्रत्येक भारतीयांनी हाणून पाडला पाहिजे आणि मुस्लिमांना वेळोवेळी समजून घेतले पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण सत्तेचे चाव्या आजही मूठभरांच्या हातात आहे, इंग्रज भारतातून गेले खरे परंतु सत्तेची चाव्या जामोटभरांच्या ताब्यात दिल्या तेच मूठभर आता भोगत आहे आणि सत्तेची खऱ्या प्रश्नांची जाण असलेल्यांना सत्तेत येऊ देत नाही.भारताच्या घटनेतील धर्मनिरपेक्षतेचे पायाभूत तत्त्व रद्दबातल करावयाचे आणि भारताला हिंदुराष्ट्र बनवायचे अशी संघ परिवाराची महत्त्वाकांक्षा आहे. शयासाठी एका बाजूला पुरोगामी, डावे व धर्मनिरपेक्षतावादी यांची ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी (स्यूडो सेक्युलॅरिस्ट) अशी बदनामी करायची तर दुसऱ्या बाजूला सर्व हिंदू-बौद्धांचा पाठिंबा मिळवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भगतसिंग आदींच्या कोणत्याही भूमिका मान्य नसताना त्यांचा गौरव करायचा अशी खेळी चालू आहे.डाव्यांना फुटीरतावादी, मुस्लिमांना धर्मांध दहशतवादी, देशद्रोही तर पुरोगामी व धर्मनिरपेक्षवाद्यांना दांभिक,अर्बन नक्षलवादी, पाक व चीन धार्जिणे,फुर्रोगामी म्हणून बदनामी करून जनतेचा बुद्धिभेद करणे पद्धतशीरपणे चालू आहे.
पण हिंदुत्ववादी हे विसरतात की,
१) भाजपच्या शासन काळात ऐतिहासिक प्राचीन रवीदास मंदिर पाडले गेले.ह्याच संत रवीदास मंदिराला ५०० एकर जागा देणारा मुहम्मद तुघलक मुसलमान होता!
२) स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाच्या विजयासाठी ४०० ब्राह्मण लोकांनी कोटीचंडी यज्ञ केला होता. त्या अफजलखानाला मारण्यासाठी वाघनखे बनवून देणारा रूस्तम ए जमान मुसलमान होता!
३) तुकाराम महाराज यांना भर पावसात मंदिर बाटेल म्हणून ब्राह्मणांनी हाकलून दिले,त्यावेळी त्यांना मस्जिद मध्ये आश्रय देणारे मुसलमान होते!
४) बहुजन समाजाला शिक्षण मिळावे म्हणून सामाजिक क्रांती करत असताना ब्राह्मणांनी ज्योतिबा फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांच्यावर दबाव आणून त्यांना घराबाहेर काढायला लावले त्यावेळी महात्मा फुले यांना संपूर्ण पुण्यातील ब्राह्मण लोकांचा विरोध पत्करून घर देणारे उस्मान शेख मुसलमान होते!
५) शहीद भगतसिंग यांना फाशी व्हावी म्हणून सूर्यनारायण शर्मा सरकारी वकील म्हणून काम करीत असताना शहीद भगतसिंग यांची फाशी रद्द करण्यात यावी म्हणून कोर्टात शहीद भगतसिंग यांचे वकील अॅड.असफअली मुसलमान होते!
६) लोकमान्य टिळकांना जेव्हा ब्रिटिशांनी कारावासाची शिक्षा सुनावली तेव्हा लोकमान्य टिळकांच्या बाजूने खटला लढवणारे बॅरिस्टर जीना हे मुसलमानाच होते.
७) बाबासाहेब आंबेडकर यांना महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला कार्यक्रमासाठी मैदान मिळू दिले नाही, त्यावेळी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवून आपल्या शेतात सभेला जागा देणारे फतेह खान मुसलमान होते!
८) भारतीय संविधान सभेच्या निवडूणूकीत बाबासाहेब आंबेडकर यांना जागोजागी पराभूत केले, त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये खुलना जस्सोर फरीदपूर बोरीशार या चार जिल्ह्यात निवडून आणून बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेवर पाठवणारे फजलूल हक ह्या राजकीय पक्षाचे सर्व लोक मुसलमान होते!
९) अण्णाभाऊ साठे यांना जातीमुळे कोणत्याही ठिकाणी घर नाकारत होते, त्यावेळी घाटकोपरच्या चिराग नगरच्या झोपडपट्टीमध्ये खोली देणारी चांदबिबी ही मुसलमान होती!
१०) चेन्नई व केरळमध्ये महापूर आला *त्यावेळी पूरग्रस्त लोकांना मशिदीत आश्रय देवून उपाशी लोकांना जेवू घालणारे मुसलमान होते!
११) सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पुरामुळे हाहा:कार उडाला होता. शासकीय यंत्रणेची मदत सर्वांनाच मिळत नव्हती.मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टर मधूनच फिरून फोटो काढत होते. हायवेवर संपूर्ण गाड्यांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक गाड्यांचे ड्रायव्हर उपाशीपोटी थांबले होते. दुकानदार १० रूपयाची बिस्किटे २०० रूपयांना ढाब्यावर विकत होते, त्यावेळी मस्जिदमध्ये पूरग्रस्त लोकांना तसेच पुरामुळे जागोजागी थांबलेल्या ड्रायव्हरांना मोफत जेवण देणारे मुसलमानच होते!
१२) करोना काळात जेव्हा हिंदूंची प्रेते घ्यायला सख्ख्या नातेवाईकांनी नाकार दिला होता त्यावेळेला अनेक तरुणांनी त्या प्रेतांची हिंदू रीतीरीवाजाप्रमाणे विल्हेवाट लावली *ते सगळे तरुण मुसलमान होते.
१३) एवढेच काय पण परवा कुंभमेळ्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होऊन कित्येक लोक मेले अशा वेळेला आपल्या मशिदी खुल्या करून अनेक भाविकांना आश्रय दिला आणि जेवूखाऊ घातले ते मुसलमानच होते.
_या सगळ्या कठीण काळात 'संकटाच्या वेळी हजारो स्वयंसेवक धावून जातात', असे उच्चारवाने म्हणणारे आणि 'गर्व से कहो...' म्हणत मुसलमानांविरुद्ध भडकवण्याचे काम करणारे कोठे होते?
_या उदाहरणावरून लक्षात येईलच की, आता दहशतवादी कोण आणि दंगलखोर कोण?
संघोट्या हिंदुत्ववाद्यांनो, तुमच्या लाडक्या मोहन भागवतांच्या म्हणण्याप्रमाणे D. N. A. ने मुसलमान या देशाचे अधिकृत निवासी आहेत. त्यांचा हा भारताच्या जडणघडणीमध्ये वाटा आहे. ते आपले मित्र आणि बांधवही आहेत. मग भागवतांचे आवाहन शिरसवांद्य मानून आता तरी मुस्लिमांचा द्वेष न करता त्यांना समानतेची वागणूक द्याल काय?
अजिज पठाण
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच-नाशिक
