काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांचेकडून शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध.
शिर्डी (प्रतिनिधी) कोणतेही विधान करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भान ठेवले पाहिजे.शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कोठून लावला हाच खरा प्रश्न आहे.जनाधार गमावलेले नेते आता चुकीची विधाने करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लागला.
शिर्डी येथील प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की शिर्डी मध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी असुन शहर सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.पुढील आठवड्यात कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत आजच्या घटनेत पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले
दरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थित ग्रामस्थ वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला.संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिरीष वमने,पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश दिघे,तसेच कैलास कोते विजय जगताप कमलाकर कोते सचिन शिंदे, नितीन कोते आदी उपस्थित होते.
